Sunday 26 August 2012

ई-मेल

आपल्याला व्यावहारिक जीवनात एखाद्या व्यक्तीला पत्र पाठवायचे असेल तर त्या पत्त्यावर आपला पत्ता ज्याला पत्र पाठवायचे आहे त्या व्यक्तीचा पत्ता असणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे इंटरनेट (Internet) द्वारे जर एखाद्या व्यक्तीला -मेल (E-mail) (संदेश) पाठवायचा असेल तर त्यासाठी देखील आपला -मेल आयडी (E-mail ID) असणे आवश्यक असते

·         -मेल (E-mail)  पाठवण्यासाठी -मेल आयडी (E-mail ID) नसेल तर तो आपल्याला इंटरनेट (Internet) वरून तयार करून घ्यावा लागतो.

·         या -मेल आयडी (E-mail ID) तयार करण्याच्या पद्धतीस आपण -मेल अकाउंट आयडी (E-mail Account) उघडणे असे म्हणतोउदा. बँकेमध्ये पैसे ठेवण्यासाठी अथवा इतर व्यवहार करण्यासाठी आधी अकाउंट  (Account) उघडावे लागते.

·         त्याचप्रमाणे -मेल आयडी (E-mail) करण्यासाठी आपल्याला एखाद्या वेब साईट (Web site) उदा. हॉटमेल, याहू, गुगलवर (Hotmail, Yahoo, Google) . -मेल अकाउंट (E-mail Account) उघडावे लागते.

Sunday 5 August 2012

Cyber Pornography

There is no settled definition of pornography or obscenity. What is
considered simply sexually explicit but not obscene in USA may well be
considered obscene in India. There have been many attempts to limit the
availability of pornographic content on the Internet by governments and
law enforcement bodies all around the world but with little effect.
Pornography on the Internet is available in different formats. These range
from pictures and short animated movies, to sound files and stories. The
Internet also makes it possible to discuss sex, see live sex acts, and
arrange sexual activities from computer screens. Although the Indian
Constitution guarantees the fundamental right of freedom of speech and
expression, it has been held that a law against obscenity is constitutional.
The Supreme Court has defined obscene as “offensive to modesty or
decency; lewd, filthy, repulsive.
Section 67 of the IT Act is the most serious Indian law penalizing cyber
pornography. Other Indian laws that deal with pornography include the
Indecent Representation of Women (Prohibition) Act
and the Indian
Penal Code.
According to Section 67 of the IT Act
Whoever publishes or transmits or causes
to be published in the electronic form, any
material which is lascivious or appeals to
the prurient interest or if its effect is such as
to tend to deprave and corrupt persons who
are likely, having regard to all relevant
circumstances, to read, see or hear the
matter contained or embodied in it, shall be
punished on first conviction with
imprisonment of either description for a
term which may extend to five years and
with fine which may extend to one lakh
rupees and in the event of a second or
subsequent conviction with imprisonment of
either description for a term which may
extend to ten years and also with fine which
may extend to two lakh rupees.
This section explains what is considered to be obscene and also lists the
acts in relation to such obscenity that are illegal.
What constitutes obscenity in electronic form?
To understand what constitutes obscenity in the electronic form, let us
analyse the relevant terms:
Any material
in the context of this section would include video
files, audio files, text files, images, animations etc. These may be
stored on CDs, websites, computers, cell phones etc.

Jurisprudence of Indian Cyber Law

The primary source of cyber law in India is the
Information Technology
Act
, 2000 (IT Act) which came into force on 17 October 2000.
The primary purpose of the Act is to provide
legal
recognition to electronic commerce
and to facilitate
filing of
electronic records with the Government. The IT
Act also penalizes various
cyber crimes and provides
strict punishments (imprisonment terms upto 10 years and
compensation up to Rs 1 crore).
Minor errors in the Act were rectified by the
Information
Technology (Removal of Difficulties) Order
, 2002
which was passed on 19 September 2002.
An
Executive Order dated 12 September 2002 contained
instructions relating provisions of the Act in regard to
protected systems and application for the issue of a Digital
Signature Certificate.
The IT Act was amended by the
Negotiable Instruments
(Amendments and Miscellaneous Provisions) Act
,
2002. This introduced the concept of electronic cheques
and truncated cheques.
Information Technology (Use of Electronic Records
and Digital Signatures) Rules
, 2004 has provided the
necessary legal framework for filing of documents with the
Government as well as issue of licences by the
Government. It also provides for payment and receipt of
fees in relation to the Government bodies.
On the same day, the
Information Technology (Certifying Authorities)
Rules
, 2000 also came into force.
These rules prescribe the eligibility, appointment and
working of Certifying Authorities (CA). These rules also lay
down the technical standards, procedures and security
methods to be used by a CA. These rules were amended
in 2003, 2004 and 2006.
Information Technology (Certifying Authority)
Regulations
, 2001 came into force on 9 July 2001. They
provide further technical standards and procedures to be
used by a CA.
Two important guidelines relating to CAs were issued. The
first are the
Guidelines for submission of application for
licence to operate as a Certifying Authority under the IT
Act. These guidelines were issued on 9
th July 2001.

क्रेडीट कार्ड वाली कन्या….

आजच भुंगाच्या ब्लॉग वर क्रेडिट कार्डवाल्या कन्येची पोस्ट वाचली.
एक जुनी गम्मत आठवली. एक दिवस माझा मुड खूप  खराब होता. सकाळपासून कस्टमर्स सारखे कम्प्लेंट्स करित होते.  काही ना कांही इशू होतेच रिझॉल्व न होणारे. नुसता वैताग आला होता. असं होतं बरेचदा.. वाटतं सगळं काही सोडून पळून जावं कुठेतरी.
होता होता लंच टाइम झाला. टुरवर असतांना बाहेरचं खावंच लागतं -अर्थात मला ते आवडत नाही असं नाही पण मुंबईला असलो की शक्यतो रोज घरूनच भाजी पोळी चा डबा आवडतो मला.  नेमकं भाजी पण मला न आवडणारी. असतो एखादा दिवस असा..
तर डबा संपवून ऑफिसमधे खाली चक्कर मारायला आणि समोरच्या भैय्या कडे पान खायला  निघालो. लिफ्ट मधून बाहेर निघालो तर तेवढ्यात फोनची रिंग झाली.. बोलणं सुरु झालं.. तसा थोडा वैतागलेलाच होतो, म्हणून कोणाला तरी ’पिडायचा’ मुड होताच.
ती:-सर, महेंद्र कुलकर्णी….!! ( प्रश्नार्थक स्टेटमेंट)
मी:-हो..
ती:-सर, आय ऍम कॉलिंग फ्रॉम…. मी ईंटरप्ट केलं…. इंग्रजी येत नाही मला….. मराठीत बोल..
ती एकदम चपापली, आणि मराठीत सुरूझाली. ( पहिली जीत.. )तिचा कॉन्फिडन्स एकदम कमी झाला, तरी पण उसन्या आवेशात तिने बोलणं सुरु केलं…मी एसबिआय बॅंकेतुन बोलत आहे.तुमच्या कंपनीचं नांव आमच्या बॅंकेच्या फॉर्चुन ५०० कंपन्यांच्या यादी  मधे आहे, आणि म्हणून आमची बॅंक आपल्याला गोल्ड क्रेडिट कार्ड देणार आहे- आणि ते पण अगदी फ्री….
मी:-अरे वा.. छानच की मग.. अगदी फ्री ना?? की काही पैसे मागाल नंतर.. मी काही देणार नाही बरं का…
ती:- अगदी फ्री आहे सर…
मी:-बरं.. द्या मग.. तशीही बायकॊ कधीची मागे लागली आहेच पाटल्या करुन द्या म्हणून,तुमचं सोन्याचं कार्ड आलं की पाटल्या करुन टाकतो. आता फुकट देताय तुम्ही..  चला, या निमित्याने का होईना बायकोची इच्छा पुर्ण होईल.. बरं हे गोल्ड कार्ड किती ग्राम चं आहे ? मला कमीतकमी ५० ग्रामचं तरी लागेल. नाहितर घरचे पैसे घालावे लागतील.. :)
माझं स्टेटमेंट ऐकुन ती अगदी कन्फ्युज झालेली लक्षात आलं..
ती:-सर, तसं नाही, तुम्हाला आम्ही गोल्ड कार्ड देउ..
मी:-  तिला मधेच इंटरप्ट करुन आपलंच घोडं दामटलं पुढे…. मग द्या ना बाई. नाही तर मी काय म्हणतो ,हे कार्ड वगैरे देण्यापेक्षा  तुम्ही सरळ मला बिस्किट का देत नाही सोन्याचं? चांगलं १०० ग्रामचं द्या..म्हणजे काय मला चांगल्या जाडजूड ५० ग्रामची एक अशा दोन पाटल्या करता येतील, आणि बायको पण एकदम खूष होईल .
ती:- सर आम्ही तुम्हाला गोल्ड कार्ड देणार म्हणजे ते कार्ड दाखवून तुम्ही सोनाराच्या दुकानातून पाटल्या विकत घेउ शकता.
मी:- ओ…..मॅडम काय चेष्टा करता काय गरिबांची- अहो पैसे कुठे आहेत माझ्या कडे.. . अहो तुम्ही आत्ताच सांगीतले ना की तुम्ही मला फ्री गोल्ड कार्ड देणार म्हणून तर मग- आता हे काय म्हणता विकत घ्या म्हणून??मी बोलत होतो , पण मला स्वतःलाच हसू आवरत नव्हतं.
ती:- समजावणीच्या सुरात.. अहो सर, आमची बॅंक तुम्हाला गोल्ड कार्ड देईल. ते कार्ड वापरलं की तुम्हाला घेता येइल पाटल्या..सोनाराच्या दुकानातून.
मी:- अहो मग द्या ना लवकर.. उगाच जास्त वेळ लावू नका.
ती:- सर तुम्ही काय करता??
मी:- मी काहीच नाही करत. आता जेवण झालं, बाहेर चाललोय बिडी ओढायला. आमचं ऑफिस एसी आहे नां, आतमधे बिडी ओढता येत नाही हो..हा एसी खुप खराब असतो बरं तब्येतिला. कधीच बसू नये एसी मधे. पण आता काय करणार, शेंट्रल एशी बसवलाय न हो.. लई त्रास होतो बघा, सारखे सांधे दुखतात माझे, तुम्हाला एखादं औषध माहिती आहे का हो?
ती:_ म्हणजे तसं नाही सर, पण तुम्ही कुठल्या पोस्ट वर काम करता या कंपनीत?
मी:- सिनियर चपराशी आहे मी इथे.  पण तुम्हाला काय करायचं, मॅडम तुम्ही आपलं सोन्याचं कार्ड द्या लवकर तुमच्या बॅंकेने आधीच अप्रुव्ह केलेलं… म्हणजे झालं..ओ मॅडम ते औषधाचं….. सांगा नां…
ती:- सर तुम्हाला क्रेडिट कार्ड म्हणजे खरंच माहिती नाही??
मी:- मला   माहिती आहे  ते.. तुम्ही आत्ताच सांगितलं ना .. गोल्ड  कार्ड  देते म्ह्णून… कधी ते बोला लवकर? आता इतका वेळ बोलतोय तुमच्याशी.. लवकर सांगा कधी देताय ते??
ती:- समजावणीच्या सुरात, क्रेडिट कार्ड म्हणजे काय ते समजावून सांगु लागली..
मी:- मधेच इंटरप्ट करुन.. मॅडम अहो ते सगळं मला काय सांगु नका, तुम्ही आधी म्हटल्याप्रमाणे सोन्याचं कार्ड द्या लवकर…
ती:- सर तुमचे कोणी ऑफिसर वगैरे आहेत का??
मी:- अहो मॅडम, त्यांना खूप पैसा मिळतो, मलाच गरज आहे सोन्याची, तेंव्हा सायबाला नाही तर मलाच द्या सोन्याचं कार्ड, तुम्हा लोकांचं असंच असतं, गरिबाला कधीच मदत करणार नाही. पैसे वाल्याला अजुन द्याल तुम्ही गोल्ड कार्ड. ओ, मॅडम, द्या की जरा गरिबाला, लई उपकार होतील बघा., नांव घेईन हो मी अन माझी बायको आयुष्यभर तुमचं…
आता ती कन्या अगदी पुर्ण कन्फ्युज झाली होती.. तिला हेच कळत नव्हतं की मी टाइमपास करतोय की खरं बोलतोय ते.सर तुम्ही खरंच चपराशी आहात कां???
मी :-नाही.. मी चपराशी नाही हो.. तुम्हाला सांगितलं ना, सिनियर चपराशी आहे म्हणून.. :P
माझ्या बरोबर माझा मित्र रोहित पाटील होता, तो अगदी तोंड दाबून हसणं दाबत होता. त्याला अगदी रहावत नव्हतं..
ती:- सर माझी चुक झाली, मी तुम्हाला नंतर फोन करते..
मी:- अहो मॅडम फोन ठेउ नका.. ते सोन्याचं कार्ड कधी पाठवणार ते सांगा आधी..
असाच तिला अजुन जवळपास पंधरा मिनिटे छळलं. शेवटी तिने वैतागून फोन बंद केला..
दोन दिवसांनी त्याच मुलीचा पुन्हा फोन आला.
अर्थात माझ्या लक्षात आलं नाही की ही   त्या दिवशीची मुलगी  असेल म्हणून.आता इतके फोन्स येतात तेंव्हा लक्षात रहात नाही हो  आवाज वगैरे. तिने इंग्लिश मधे बोलणं सुरु केलं, आणि मी नेहेमी प्रमाणे अगदी सहज पणे रिप्लाय केला इंग्लिश मधे,  आणि तिच्या लक्षात आलं की मी तिची चेष्टा केली होती चार दिवसांपूर्वी .
ती मुलगी लगेच मराठीत बोलायला लागली,सर मी तुम्हाला फोन केला होता चार दिवसांपूर्वी, तुम्ही मला म्हणालात, की इंग्लिश येत नाही तुम्हाला, आणि तुम्ही सिनियर चपराशी आहात म्हणून…:)
ती म्हणाली सर ( स आणि र मधे खूप अंतर होतं. अगदी लाडात येउन बोलायला लागली होती ती), तुम्ही माझी मापं काढलीत नां??
मी म्हंटलं,  माझं कुठे गं तेवढं भाग्य. लहान पणी वाटायचं की आपण कासार व्हावं, आणि चांगल्या चांगल्या मुलींच्या हातामधे बांगड्या भराव्या म्हणून, किंवा लेडिज टेलर व्हावं.. ( कशाला ते लिहित नाही, जास्त वात्रटपणा शोभत नाही या वयाला ) पण नव्हतं ना आमच्या नशिबात..  कशी मापं काढणार?
असु दे….. तिने तेवढ्यात मला ’त्या’ दिवसाची आठवण करुन दिली आणि  फोन वर मनसोक्त हसायला लागली, म्हणे सर तुम्ही ग्रेट आहात हं….क्रेडिट कार्ड वालीला फोन बंद करायला लावलात. ती पुढे म्हणाली, सर त्या दिवशी ची ती  आयुष्यातली पहिलीच वेळ बरं का, की मी स्वतः फोन कट केल्याची..
मी तिला म्हट्लं. मला माफ करा, त्या दिवशी जरा मुड खराब होता, आणि तुमच्याशी बोलल्यावर एकदम फ्रेश वाटायला लागलं.. धन्यवाद.. मला वाटतं की मी पहिलाच माणुस असेल तुला धन्यवाद देणारा.. आणि  हसून बाय म्हणून फोन बंद केला…

राजकारण २०१२

परवाचीच गोष्ट, शेजारची  ८ वित शिकणारी  छकू  आली होती, म्हणाली- काका मला एक निबंध लिहायचा आहे  , त्यात तुम्ही  मदत करता का?  म्हंटलं कशावर लिहायचा  आहे ग तुला निबंध ? तर म्हणे,   राजकारणावर! मुलांना राजकारण समजावं म्हणून  टीचरने  राजकारणावर एक निबंध लिहून आणायला सांगितलाय  .म्हंटलं ठीक आहे.. सांगतो तुला. आणि छकू बसली समोर कागद पेन घेऊन लिहून घ्यायला.
तिचं लक्ष  बाजूला पडलेला मटा  कडे गेलं , तो उचलला आणि   म्हणाली काका, हे बघा, बाळासाहेब आणि शरद पवारांची युती होणार आहे- तिचं हे वाक्य ऐकून   मला एकदम आश्चर्याचा धक्काच बसला !   मी म्हंटलं की काहीतरीच काय म्हणतेस-  तर तिने मटा समोर धरला.  ती बातमी मी आधीच वाचलेली होती, त्यात बाळासाहेब म्हणाले होते, की शरद राव माझे फार जवळचे मित्र आहेत -
छकू आता  त्याचं असं आहे, की  ते मित्र आहेत असे जरी म्हणाले  असले तरीही ते इलेक्शन मधे एकमेकांविरुद्ध आपापले कॅंडीडॆट्स उभे करणार आहेत.  अशी कन्फ्युज होऊ नकोस.. थोडं व्यवस्थित सोपं करून तुला मी  राजकारण  म्हणजे  काय ते सांगतो बघ. कुठल्याही राजकीय  पक्षाला  एकट्याच्या बळावर महाराष्ट्राची सत्ता काबिज करता येणे शक्य नाही, ही गोष्ट सगळ्याच नेत्यांना माहिती आहे. मग आता इलेक्शन जिंकायला म्हणून हे सगळे पक्ष आपापसात युती करतात आणि इलेक्शन लढतात. ही युती का आणि कशी होते? याचे उत्तर मला तरी माहिती नाही.तरी पण जे काही माहिती आहे ते थोडक्यात सांगतो!
भाजपा हा राष्ट्रीय पक्ष आणि  त्याचा मित्र पक्ष म्हणून शिवसेनेशी नियमित पणे प्रत्येक निवडणुकीत  युती होत असते. आता असं पहा,  की बाळासाहेब म्हणतात की शरद पवार माझे मित्र , शरद पवार हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे- आणि सोनिया कॉंग्रेसच्या मित्र पक्षातले ! सोनिया कॉंग्रेस ही  शिवसेनेची शत्रू पण राष्ट्रवादीची मित्र!  राष्ट्रवादी कॉंग्रेसची   भाजपा हा शत्रू नंबर एक  . गडकरी हे भाजपाचे अध्यक्ष आहेत, पण वैय्यक्तीक पातळीवर ( म्हणजे काय ते मला विचारू नकोस छकू )       पवारांचे मित्र  आहेत आणि तरीही  ते  राष्ट्रवादीचे शत्रू आहेत – समजलं का तुला?   काय म्हणतेस छकू??     शरद पवार  हे मित्र पक्षाचे  (भाजपाचे )शत्रू या नात्याने बाळासाहेबांचे/गडकरींचे पण शत्रू असायला हवेत? नाही का? एकदम सोप्पं आहे बघ!
अगं छकू  असं  काय करतेस?  शरदराव, बाळासाहेबांचे मित्र   आहेत ,  तर मग त्यांच्याशी युती न करता – शिवसेनेचॊ युती ही  भाजपा बरोबर  का करतात ?  गडकरी हे आपले मित्र आहेत असे बाळासाहेबांनी सांगितल्याचे  कधी आठवत नाही  म्हणतेस – खरंय गं.. मला पण नाही आठवत. दर निवडणूकीच्या वेळेस बाळासाहेब भाजपा नेत्यांबद्दल  पेपर मधे उलटसुलट काहीतरी बातम्या देतात ? एक वर्षापूर्वीची बातमी पहा इथे..  जाऊ दे तुला नाही कळायचं  .
आता असं बघ, मागच्या निवडणुकीत रामदास आठवले यांनी शरद पवारांच्या   राष्ट्रवादीच्या बरोबर युती केली होती.अगदी गळ्यात गळे  घालून वावरले ते शरदरावांच्या . याचं कारण असं की तेंव्हा राष्ट्रवादीला वाटले की आठवलेंच्या मुळे दलित मते कॉंग्रेसकडे वळतील. पण दलित मतदार  आता    प्रगल्भ झालाय, रामदास आठवले, किंवा इतर कुठल्याही गटाच्या सांगण्यानुसार मतदान करीत नाही. स्वतःची बुद्धी वापरून मतदान करतात, त्या मुळे मागच्या निवडणुकीत रामदास आठवलेंचा  पार सुपडा साफ झाला. अजिबात मत दिले नाहीत त्यांच्या कॅंडीडॆट्सला. असं म्हणतात, की , तेंव्हा आठवले यांना  संशय आला होता, की शरदरावांनी आपले परममित्र बाळासाहेब यांच्याबरोबर हातमिळवणी करून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेला मत द्या असे सांगितले होते. बहुतेक आठवलेंची अपेक्षा असेल की यंदाही तसंच काही तरी होईल आणि आपल्याला राष्ट्रवादीची मते मिळतील- म्हणून या वर्षी शिवसेनेबरोबर युती केली असावी का? किती सोपं आहे बघ राजकारण! कित्ती कित्ती भोळे आहेत ना आठवले?
राज ठाकरे मनसेचे जरी सर्वोसर्वा असले तरीही त्यांचा विश्वास हा  शिवसेना    म्हणजे शत्रूपक्ष नंबर एक चे अध्यक्ष बाळासाहेबांवर आहेच. शरदराव राज ठाकरे यांचे पण मित्र,  पण त्यांच्या मनसे या पक्षाच्या  शत्रू न्ंबर दोनचे अध्यक्ष! राज पण राष्ट्रवादीचे शत्रू. नारायण राव यांनी पण आपला कोंकणात एक “स्वाभिमान” पक्ष काढल्यावर   राज ठाकरेंचे मित्र झाले – बहुतेक शत्रूचा शत्रू तो आपला मित्र- म्हणून  असे असावे.  राणे, बाळासाहेबांचे शत्रू , बाळासाहेब – राज ठाकरेंचे शत्रू, पण राज ठाकरे हे बाळासाहेबांना शत्रू मानत नाहीत, तर केवळ शिवसेनेला शत्रू मानतात , शरद पवार हे राज ठाकरे, नारायण राणे, उद्धव, बाळासाहेब, गड्करी,सोनिया गांधी  या सगळ्यांचे मित्र..- किती सोपं आहे की नाही??.
राज ठाकरेस्वतःचा वेगळा पक्ष असतांना सुद्धा आपल्या शत्रू पक्ष म्हणजे   शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब यांचा जाहीर पणे  मिडीया समोर पोवाडा गात असतात.
मध्यंतरी एकदा राज ठाकरे आपल्या शत्रू पक्ष म्हणजे भाजपाच्या गुजरात मधे जाऊन आल्यावर  आपल्या शत्रूपक्षाच्या मुख्यमंत्र्यांची म्हणजे नरेंद्र मोदी यांची  तोंडफाटेस्तोवर स्तुती केली होती. तेंव्हा उगाच मिडियाने पण पिल्लू सोडले होते की आता बहूतेक शिवसेना , मनसे आणि भाजप एकत्र निवडणूक लढवणार म्हणून. पण तसं नसतं. तुझी मेमरी फारच विक आहे गं छकू, आठवतं का? राज ठाकरेंच्या चार आमदारांना डीबार केले गेले होते. नंतर त्यांना पुन्हा रिइन्स्टेट करवुन घेण्यासाठी राज ठाकरेंच्या आमदारांनी स्वतः विरोधी पक्षात असूनही सत्ताधारी शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला   सरकार वाचवण्यासाठी मतदान केले होते. :)
उघडपणे एकमेकांवर चिखलफेक करण्याचे काम उद्धव आणि राज करत असतात. त्या दोघांच्या या अशा  वागण्याने आपल्यासारख्या सामान्य बिनडोक जनतेचे खूप मनोरंजन होते- आणि शरदरावांचा ( त्यांच्या वैय्यक्तिक मित्राचा) फायदा होत असतो. अधूनमधून दादा पण यात आपले हात धुवून घेत असतात.
काही दिवसांपूर्वी बाळासाहेबांच्या महालात छगनराव पण गेले होते भेटायला. तेंव्हा अशीही चर्चा होती की ते आता राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत परत जाणार – पण छकू , ती पण एक चाल होती. बाळासाहेबांचा वापर करून घेतला होता , छगनरावांनी, आपले कॉंग्रेसमधले स्थान पक्के करून घ्यायला. समजलं कां तुला? छगनराव गेले मातोश्री वर आणि तिकडे शरदराव एकदम अस्वस्थ झाले होते बघ. आठवते का तुला ते?? असो.
ह्या सगळ्या राजकारण्यांच्या दृष्टीने  राजकारण म्हणजे एक खेळ आहे. या खेळात वेगवेगळे चेहेरे लावून जोकर सारख्या कोलांट उड्या मारून हे राजकारणी आपले मनोरंजन करत असतात  आणि त्याच सोबत खेळ खेळतांना डाव कशा जिंकायचा किंवा विरोधकांचा डाव कसा उलटवायचा  हाच विचार करत असतात.  नेता जितका मोठा- खेळ तितकाच मोठा. खेळ पहातांना आपल्याला उगाच असं  वाटत असतं  की आपली फुकट करमणूक होत आहे, पण तसे नाही- त्या साठी आपण नकळत फार मोठी किंमत मोजत असतो.
बरं छकू , ते जाऊ दे, आता तुला समजलं ना राजकारण म्हणजे काय ?? चल लिही बघू आपला निबंध, आणि जर काही समजलं नाही तर मला विचार मी समजावून सांगेन  बरं का तुला.

वाइफ बॅशिंग सर्व्हे

आपण नेहेमीच वापरतो. तो कसा  काय अस्तित्वात आला हे ठाऊक आहे ? पूर्वीच्या काळी इंग्लंड  मधे बायकोला मारण्यासाठी जास्तित जास्त  अंगठ्या एवढ्या जाड केन ने मारणे  कायद्याने मान्य होते,  म्हणून थंब रुल हा शब्द अस्तित्वात आला.
राजा भाऊंचं लग्न झालं होतं, तीर्थरुपांच्या समोर पाया पडायला म्हणून जोड्याने वाकल्यावर , वडील हळूच फक्त राजाभाऊंना ऐकु येईल अशा आवाजात  म्हणाले, नमस्कार करायला आलात, एक गोष्ट सांगतो, आता तुम्ही गृहस्थ झाला आहात- स्वतः बरोबर पत्नीचीही जबाबदारी आता तुमच्यावर आहे. प्रसंगी भांडणं होतील, खूप संताप येईल – पण तेंव्हा मी आज सांगतो ती गोष्ट लक्षात ठेवा ” पत्नी ही घरातली लक्ष्मी असते, तिच्यावर कधीच हात उचलायचा नसतो”. ही शिकवण राजा भाऊंच्या अगदी मनात पक्की बसल्याने,   आयुष्यभर प्रकर्षाने पाळली.असं नाही की  राजा भाउंचे कधी बायकोबरोबर भांडण होत नाही, किंवा त्यांना बायकोचा राग येत नाही, पण  वडिलांनी सांगितलेले वाक्य आठवतं आणि मग हात उचलला जात नाही- राग शांत होतो.
लग्न झाल्यावर भांडणं होणारच-  आयुष्यभर  “न भांडता ” सोबत रहाणारे नवरा – बायको मला अजून तरी भेटायचे आहेत.  लव्ह मॅरेज असो की अरेंज्ड, भांडणं ही ठरलेली आहेतच- फक्त त्याची तीव्रता कमी जास्त होऊ शकते. वाद विवादाची तीव्रता वाढल्यावर  बायकोवर हात उचलणे हे पण तसं जगभर कॉमन   आहे.  बाहेरच्या देशात अशा केसेस तर नेहेमीच रजिस्टर होत असतात.
जगभरात नवऱ्याने बायकोला  मारहाण  करण्याची जी चार मख्य कारणं आहेत ती अशी आहेत. १) सेक्स ला नकार देणे २) वाद विवाद करणे ३) न सांगता घराबाहेर जाणे ४)मुलांकडे दुर्लक्ष करणे ही आहेत.
या घटना फक्त  समाजाच्या खालच्या आर्थिक  स्तरांमधेच  ( कामगार वर्ग, ब्लु कॉलर्ड )  घडतात असे नाही , तर ’उच्च शिक्षित , कारखानदार, सिनेमा नट – नट्या’  सगळ्यांच्याच बाबतीत  या  प्रकारच्या घटना  घडत असतात. अ्धुन मधून एखाद्या अशा घटनेच्या  शिकार शिकार झालेल्या  एखाद्या अभिनेत्रीचे फोटो  पेज थ्री वर पण  दिसतो.  अशा घटना जरी घडत असल्या तरीही ,फक्त  बहुतेक वेळा अशा घटनांना प्रसिद्धी  न देता, पातेल्यातलं वादळं पेल्यातच शमवले जाते.  पोलीसांपर्यंत जाणाऱ्या तक्रारींचे प्रमाण नगण्य आहे.
“   बायकोला पुरुषाने मारणे  हे तुम्हाला योग्य वाटते की अयोग्य?” ह्या प्रश्नावर  टाइम्स ऑफ इंडीयाने एक प्रातिनिधिक स्वरुपाचा सर्व्हे केला होता. सर्व्हे फक्त टीनएजर्स साठी – वय वर्ष १५ ते १९ पर्यंतच्या तरूण तरूणींच्या साठी होता.    यावर   तरुण , तरुणींनी दिलेली  उत्तरं आणि सर्व्हेचे रिझल्ट वाचल्यावर मला तर धक्काच बसला आणि  वाईटही वाटलं. कारण परिस्थितीच  तशी काळजी करण्यासाखी  आहे.
५७ टक्के मुलांनी आणि ५४ टक्के मुलींचे पण  बायकोला मारणे योग्य असेच मत दिले. एक वेळ मुलांनी बायकोला मारहाण करणे योग्य  हे मत दिले तर एक वेळ समजू शकतो,  पण ५४ टक्के  मुली पण जेंव्हा स्त्रियांना नवऱ्याने मारल्यास हरकत नाही असे मत देतात, तेंव्हा त्यांच्या मानसिक जडणघडणीची कीव येते – त्यांची  लग्नानंतरच्या  सह जीवनाविषयीची ही अशी मतं पाहिल्यावर ह्या मागचे कारण काय असेल याचा विचार केल्यावर जे काही माझ्या मनात  आलं   ते खाली लिहितोय.
मुला-मुलींनी जे आपले स्वतःचे  मत  तयार करून घेतले आहे,   त्या साठी, त्यांना  मी या अशा विचारांसाठी दोष देणार नाही. मुलांची कुठल्याही गोष्टीवरची मतं ही एकदम तयार हो नसतात. लहानपणापासून  आसपासच्या घटनांचा त्यावर परिणाम होत असतो. एखाद्या  अगदी लहानपणापासून पट्टीच्या नॉन व्हेज खाल्लं जाणाऱ्या  घरातल्या मुलाला, कदाचित चिकन च्या दुकानात ते कापताना आणि स्वच्छ करतांना पाहून काही वावगं वाटणार नाही, कारण ते त्याकडे पहाण्याची त्याची दॄष्टी ही एक अन्न म्हणून असते. पण व्हेज खाणारा मुलगा, चिकन कापतांना पाहू शकणार नाही- कारण त्याच्या दृष्टीने चिकन ही एक कोंबडी म्हणजे जीव आहे.  दृष्टीकोन बदलला की विचार कसे बदलतात याचे हे एक उदाहरण.
मुलांवर लहानपणापासून कळत नकळत  संस्कार होत असतात. दुसऱ्याचे अनुकरण करणे हे लहानपणचे लक्षण आहे. बालवाडीत गेल्यावर पहिल्या दिवशी जेंव्हा एक मूल रडू लागते, तेंव्हा त्याला पाहून सगळा वर्ग गळा काढणे सुरु करतो. हे मुलं खेळायला शेजारी पाजारी गेली, की त्यांचा इतरांशी संबंध आला , की मित्र मंडळीचे पण मनावर नकळत संस्कार होत असतात. एखाद्या सिगरेट ओढणाऱ्या मित्रांमुळेच सिगरेटची सवय लागू शकते- (मला लागली होती). संगती संग   दोष अशी काहीशी एक म्हण आहे.
संस्कारक्षम वयामधे   टीव्ही वरच्या सिरिज, किंवा सिनेमा यांचाही खूप परिणाम होतं.  येता जाता उच्चभ्रू (!) घरातल्या पुरुषांनी स्त्रियांच्या खाडकन थोबाडीत मारणे वगैरे  तर नेहेमीच दाखवले जाते.  नेहेमी  तेच ते पाहून तेच योग्य आहे असे कशा वरून वाटत नसेल? स्वप्नरंजन आणि वास्तव यांची सरमिसळ होऊन मनात  द्वंद्व निर्माण होते. एखादी गोष्ट योग्य की अयोग्य हा निर्णय मनाला घेता येत नाही.
मुलांवर आई-वडिलांकडून केले गेलेले संस्कार सगळ्यात महत्त्वाचे. त्या संस्कारांवर इतर समाजातील घट्क  करणारे संस्कार सहजा सहजी ओव्हरपॉवर करू शकत नाही. आपले आईवडील कसे वागतात याकडे पाहूनच मुलांचे स्वतःचे विचार मनात पक्के होत असतात.  घरात जर मुलांनी लहानपणा पासुनच जर वडिलांना आईला मारहाण करतांना पाहिले असेल, तर त्या मधे अयोग्य वाटणार नाही. मला वाटतं की   सर्व्हेचा जो निकाल आलाय , त्याचे कारण पण  कदाचित त्या मुलांच्या घरची  परिस्थिती किंवा  वातावरण  असावे- आणि जर खरंच असे असेल तर ते काळजीचे कारण आहे.
आज स्त्रिया स्वावलंबी झाल्या आहेत, शिकल्या आहेत, स्वतः पैसा कमावू शकतात, इतकं असतांना पण त्यांनी अशा प्रकारे मारहाण करुन घेण्याची मानसिक तयारी दाखवावी हे मला खरंच पटत नाही. जर ५४ टक्के स्त्रियांना नवऱ्याकडून होणारी  मारहाण  योग्य वाटत असेल तर हे शिक्षण व्यर्थ आहे असे खेदाने म्हणावे लागेल. स्त्रियांनी स्वतःचे ’स्व’त्व ओळखून या अशा मारहाणीचा निकराने प्रतिकार करायला हवा असे   मला वाटते.
इतर देशातला सर्व्हे रिपोर्ट. काही मुस्लीम बहूल भागात हे योग्य असे वाटणारे ९० टक्के स्त्रिया आहेत  (!)

अब्रू ची किंमत किती आहे हो??

एका स्त्री च्या   अब्रूची किंमत किती असेल हो ?  मग ती  स्त्री श्रीमंत, गरीब , भिकारी अगदी कोणीही असू शकते.किती असेल किंमत?? विचित्र  वाटतोय का प्रश्न? कदाचित असेलही, कारण लिहितांना पण मला थोडं अवघडल्यासारखं झालं होतं. इथे अब्रू म्हणजे हिंदी सिनेमात  जेंव्हा एखादी हिरोईन “मेरी इज्जत लुट ली जज साब इसी कमिनेने” म्हणते नां ती अब्रू म्हणतोय मी. आज सकाळी टाइम्स ऑफ इंडीया उघडला आणि एका बातमीने लक्ष वेधून घेतले. एका कंडक्टरला बलात्काराच्या गुन्ह्याला बद्दल फक्त ६००० रुपये शिक्षा सुनावण्यात आली .  एका मुलीवर बलात्कार केला जातो, आणि तिच्या अब्रू ची किंमत कोर्ट    फक्त सहा हजार ठरवतं.
काही दिवसापूर्वी एका केसचा निकाल पेपर मधे वाचला होता. त्या मधे कोर्टाने निकाल दिला होता की ज्या माणसाने बलात्कार केला त्या माणसावर त्याचे म्हातारे आईवडील अवलंबून आहेत, म्हणून त्याला जेल मधे न टाकता    ५०००० रुपयांचा दंड इतकी शिक्षा करण्यात येत आहे.
वर दिलेल्या दोन केसेस फक्त नमुन्यादाखल लिहील्या आहेत. वरच्या दोन्ही निकालावर काही भाष्य करणे हा कोर्टाचा अपमान होऊ शकतो, म्हणून फक्त इतकंच म्हणतो की कोर्टाच्या दृष्टीने एका स्त्री च्या अब्रु ची किंमत ही साडे सात ते पन्नास हजार रुपये !!!
हे वाचल्यावर कदाचित  थोडी असहाय्यता, थोडी चिड , थोडा संताप अशा सगळ्या संमिश्र भावना मनात येतील.  मागच्या आठवड्यात एका ७४ वर्षाच्या गृहस्थाने दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून त्यांची चित्र फित बनवल्याचे वाचण्यात आले . ही बातमी जवळपास तीन दिवस दररोज येत होती. अशा तऱ्हेने की जणू काही हा जगातला पहिला आणि शेवटचा बलात्कार असावा . तो थेरडा तर सिरियल रेपीस्ट होता. त्याच्या कडे बऱ्याच सिडी सापडल्या. असो मुद्दा तो नाही. बलात्काराच्या केस मधे वृत्तपत्राच्या बातमीदारांच्या लेखणीला विशेष धार येते , आणि तोच तो विषय पुन्हा पुन्हा लोकांसमोर मांडला जात असतो- कारण लोकांनाही तेच वाचायला आवडतं.
बलात्कारा बद्दल पुर्वी एक लेख लिहिला होता “ बलात्काराष्ट्र” म्हणून. त्यात बरेच मुद्दे आले आहेत, म्हणून आता पुन्हा तेच ते लिहित नाही.आपण भारतीय लोकं पण थोडे विचित्रंच आहोत. ज्या भक्ती भावाने  रामायनातले सुंदर कांड ऐकतॊ किंवा सितेची पूजा करतो त्याच भक्तीभावाने महाभारतातिल द्रौपदी च्या चीरहरणाचा प्रसंग पण ऐकतॊ. खरंच कसे आहोत आपण?
दुर्दैवाने असे म्हणावे लागते की स्वातंत्र्योत्तर काळात स्त्रीचे जितके अवमुल्यन झाले आहे तितके पूर्वी कधीच नव्हते . पूर्वी स्त्री च्या अंगावर चार चौघांसमोर हात घालायची कोणाची प्राज्ञा नव्हती. आजच्या काळात एका स्त्रीची नग्नावस्थेत गावभर धिंड काढल्याची बातमी आपण अगदी मेलेल्या मनाने वाचतो. फक्त हे आपल्या बाबतीत होत नाही म्हणुन आनंद मानायचा अशी मनोवृत्ती हल्ली वाढीस लागलेली आहे. वर्षभरा पूर्वी एकदा मालाडला लोकलमधे चढतांना एक माणूस स्त्रियांच्या फर्स्ट क्लास मधे सौ. च्या मागे शिरला आणि त्याने चढतांना तिच्या पर्स मधे हात घातला. हे सगळं होत असतांना डब्यातल्या सगळ्या इतर स्त्रिया पहात होत्या, सौ. च्या लक्षात आल्यावर तिने त्याला पर्सने फटकारून दूर ढकलले, पण डब्यातली एकही बाई मदतीला धाऊन आली नाही. इतक्या सगळ्या बायकांसमोर त्या एकट्या माणसाचे काही चालले नसते, पण समाजातल्या एकजूटीचा अभाव- आणि मला तर त्रास होत नाही ना? ही मनोवृत्ती वाढीस लागलेली आहे.
पूर्वी एखाद्या मुलीला छेडतांना ती आपल्या भावाला, वडीलांना सांगेल ही भिती असायची , पण हल्ली वडिलांसमोर किंवा भावासोबत असलेल्या मुलींची पण छेड काढ्ण्यास कोणी घाबरत नाही.पूर्वी शेजारच्या घरातल्या मुलीला जरी कोणी छेडलं तरीही सगळे एकत्र येऊन त्या छेडणाऱ्याच्या घरी जाऊन कम्प्लेंट करायचे. आजकाल, बाप मुलाला मोटरसायकल घेऊन दिल्यावर म्हणतो, ” एखादी मुलगी पटव मागच्या सिटवर बसवायला” !असो जग फार पुढे जातंय असं वाटतं मला तरी.
या जगात पुरुष हा ५० टक्के श्वापद  असतो असे म्हणतात पण मला आजची परिस्थिती  पहाता पुरुष हा ९० टक्के गिधाड झाला आहे असे वाटते. जेंव्हा ही ९० टक्के श्वापदं स्त्रीयांकडे एक शिकार म्हणून पहातात तेंव्हा इतर दहा टक्के लोकं कुठेतरी नजरा लपवून बसलेले असतात. अहो-  जनावरांमधे तरी मेटींग ची काळ वेळ ठरलेली असते- अगदी तिन्ही त्रिकाळ सेक्सचा विचार हे प्राणी पण करत नाहीत. त्यांची पण वेळ ठरलेली असते. कुत्रा फक्त भाद्रपद महिन्यातच कुत्रीच्या मागे मागे असतो, पक्षी पण केवळ विणीच्याच काळात एकमेकांच्या जवळ असतात, पण मानव मात्र अगदी चोविस तासात कधीही सेक्स साठी स्वतःला तयार करू शकतो.  हेच ते कारण आहे की आज स्त्री स्वतःला सुरक्षित समजू शकत नाही.
लोकलच्या ब्रिज वर असो किंवा रेल्वे प्लॅटफॉर्मचा जिना चढताना असो, पुरुषाचे ओंगळवाणे स्पर्ष झेलल्या शिवाय स्त्रीला साधे चालता येणे पण अशक्य झालेले आहे. रस्त्यावरच्या नाक्यावर उभ्या असलेल्या वासू लोकांच्या कॉमेंट्स झेलल्या शिवाय रस्त्यावर चालणं पण मुश्किल झालेले आहे. ही परिस्थिती फक्त मुंबई मधेच आहे असे नाही, अगदी लहान शहरातही अशीच परिस्थिती आहे. आपली मानसिकता बरीच बदलली गेली आहे. पूर्वी स्त्री कडे पहाताना आई, बहीण, वहिनी वगैरे अशी नाती असायची, पण हल्ली मात्र एकच नातं उरलं आहे. ते म्हणजे नर आणि मादी.
जी गोष्ट कधीतरी घडते त्या गोष्टी बद्दल लोकांना काहीतरी अट्रॅक्शन असतं. पण जेंव्हा   विदर्भातल्या शेतकऱ्यां प्रमाणे दररोज आत्महत्या होणे सुरु झाल्यावर पहिल्या पानावरून ती बातमी तिसऱ्या पानावर, आणि आता कुठल्यातरी कोपऱ्यात दिलेली असते  आत्महत्या या जितक्या सहजपणे अजिबात मनाला लावुन न घेता वाचल्या जातात, तेवढ्याच अलिप्तपणे हे बलात्काराच्या बातम्या वाचल्या जातात, पण बलात्काराच्या बातम्यांचे पहिल्या पानावरचे स्थान दुर्दैवाने  कायम आहेच.
असं म्हणतात, की पूर्वी मुंबई सगळ्या स्त्रीयांसाठी खूप सुरक्षित होती- पण आज तशी परिस्थिती राहिलेली नाही.भर दिवसा जेंव्हा लोकल मधे एक गर्दुल्ला स्त्री ची पर्स हिसकू शकतो, हल्ला करू शकतो, सगळ्यां समोर शारिरिक अंगचटीला जाऊ शकतो, तेंव्हा सुरक्षितता कशाला म्हणायची हाच प्रश्न पडतो.
स्त्रियांनो,  आज तुमचे संरक्षण करण्यासाठी कोणी नाही.  तुम्ही घराबाहेर पडल्या की तुम्ही ह्या श्वापदांच्या पिंजऱ्या आहोत हे समजून चाला. तुम्ही कितीही पवित्र असलात तरीही  ह्या पुरुषांना जन्म देण्याचे तुम्ही पाप केलेत, आणि आता त्याच पापाची फळं तुम्हालाच  भोगावी लागत  आहेत. आचार्य अत्रे यांचं एक वाक्य आठवलं.. ” स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, ह्रदयी  अमृत नयनी पाणी”