नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याची इच्छाच संपली आहे. कोणालाच मेसेजेस , इ मेल्स पाठवले नाहीत. उगीच कुठेतरी खुपल्या सारखं होतंय. कारण दामिनी! दिवसभर दामिनीच्या सपोर्ट साठी बरेच लोकं मेणबत्त्या घेऊन टिव्हीवर दिसत होते. टॉकिंग हेड्स टीव्ही वर बडबड करत होते. काही सो कॉल्ड एक्स्पर्ट तर टिव्ही वर म्हणत होता की स्त्रियांनी पर्स मधे मिरचीची पूड आणि चाकू ठेवावा म्हणजे कोणी हल्ला केल्यास प्रतिकार करता येईल. हे असे मूर्खासारखे विचार मांडणारे वैचारिक षंढ कसे काय टिव्ही वर येतात कोण जाणे! त्यांची बडबड ऐकून तर अजूनच संताप येत होता.
माझ्या मनात विचार आला, समजा एखाद्या मुलीने चाकू पर्स मधे ठेवला, आणि जर गुंडाने तोच चाकू हिसकावून प्रहार केला तर? आणि मिरचीची पूड पण त्या मुलीच्या हातून हिसकावून तिच्यावरच वापर केला तर? अगदी सहज शक्य आहे की नाही?उगीच टिव्ही वर आलो म्हणून काही पण बडबड करायची?
गुंडांच्या हातून वाचायचे असेल तर रिव्हॉल्वर हेच एक साधन उपयोगी पडु शकते. आणि आपल्याकडे तर लायसन्स मिळणे दुरापास्त आहे.आणि जरी समजा लायसन्स मिळाले तरी पण रिव्हाल्वर वापरण्याची हिंम्मत तरी व्हायला हवी ना? असो..
खरंच काय करता येऊ शकेल? एक उपाय सुचतोय, जितके व्हिव्हिआयपी आहेत,त्या नेत्यांच्या मुला, मुलीं सकट घरच्या सगळ्याच लोकांना ! अगदी यांच्या घरात जितके लोकं आहेत, त्या सगळ्यांना झेड सिक्युरिटी दिल्या गेलेली असते. तसेच सिनेमाचे हिरो हिरोईन्स- त्यांना ला पण फुकट मधे झेड सिक्युरिटी देण्यात येते- म्हणे त्यांच्या जिवाला धोका आहे म्हणून! या सगळ्यांची सिक्युरिटी काढून घेतली तरी लाखो सिक्युरिटी चे लोकं मोकळे होतील, की ज्यांना सामान्य जनतेसाठी वापरली जाऊ शकते. हे सगळे धनदांडगे नेते आणि सिनेमाची धेंडं स्वतःच्या पैशाने सिक्युरिटी विकत घेऊ शकतात हे अगदी कोणीही मान्य करेल- पण लोकशाही मधे ……………. असो, दुसरी गोष्ट म्हणजे बलात्काराला शिक्षा ही कडक द्यायला हवी, सध्या कायद्याने या गुन्ह्यासाठी फारच कमी शिक्षा दिल्या जाते. खाली दिलेला लेख वाचा-लिंक खाली दिलेली आहे .
आज सकाळी साधारण एक वर्षापूर्वी लिहिलेला हा लेख पुन्हा वाचला. एका बलात्काराविषयीचा हा लेख ११ डिसेंबर 20११ रोजी लिहिला होता.
स्त्रियांचे शोषण तर युगानुयुगे चालत आलेले आहे, कधी प्रेमाने, तर कधी धाकाने. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आजही स्त्री पुरुष संबंध ( ऑफिस, घर, बाहेर, कुठेही) जेंव्हा रेफर केले जातात, तेंव्हा ते केवळ सेक्स्युअल रेफरन्स मधे असतात. ऑफिस मधे जेंव्हा बरोबरच्या स्त्री कलिग बद्दल तिच्या अपरोक्ष बोलले जाते तेंव्हा अशा लूज कॉमेंट्स नक्कीच पास केल्या जातात. जेंव्हा पुरुष स्त्री ला म्हणतो ,की माझे तुझ्यावर प्रेम आहे – याचा गर्भितार्थ म्हणजे “आय वॉंट टू स्लिप विथ यु” हा असतो , पण जेंव्हा एखादी स्त्री एखाद्या पुरुषाला आय लव्ह यु म्हणते, तेंव्हा तिचा उद्देश हा भावनिक गुंतवणूक हा असतो. कदाचित पुरुष ही गोष्ट सहज मान्य करणार नाहीत, पण हीच खरी गोष्ट आहे. एक युगानुयुगे चालत आलेले सत्य हे पण आहे, जर कधी भांडण झालेच तर ते संपवायला, स्त्री ला प्रेमाचा मार्ग दोन पायातून शोधावा लागतो. असो.. मन विषण्ण झाले आहे. जास्त लिहत नाही. इथेच संपवतो.