Saturday, 23 March 2013

लिंक शेअर करुन जास्त पैसे कमवणे

आपली मूळ लिंक (उदा. http://RemixMarathi.com) एका दुसर्‍या लिंकमध्ये बदलल्यानंतर (हे कसं? ते मी या लेखात पुढे सांगत आहे) आपल्या नवीन लिंकवर जेंव्हा लोक क्लिक करतात, तेंव्हा त्यांना जाहिरात दिसते व त्यानंतर त्यांना मूळ पानाकडे जाता येते. अशाप्रकारे आपल्या लिंकवरील प्रत्येक क्लिकमागे आपल्याला काही पैसे मिळतात. सबंध दिवसात कोणीही कितीही वेळा आपल्या लिंकवर क्लिक करु शकेल, तेंव्हा आपल्या कमवण्याला मर्यादा नाही. आपण शक्कल लावून किती चांगल्याप्रकारे हे करु शकाल? त्यावर आपली कमाई अवलंबून असेल. खाली त्या संदर्भातील माहिती मी सोप्या शब्दात सांगत आहे.

१. लिंक शेअर करुन पैसे कमवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला या साईटवर जावं लागेल. 
२. या साईटवर गेल्यानंतर Sign Up या बटनावर क्लिक करा. आपल्यासमोर एक Registration Form उघडला जाईल. 
३. तिथे विचारलेल्या जागेत आपल्याला हवे असे Username, Password, आणि आपला Email Address द्यावा. आपल्याकडे पेपालचे (याबाबत लेखाच्या शेवटी अधिक माहिती देण्यात आली आहे) खाते नसेल, तर Payment Account (Publishers) हा पर्याय आत्तापुरता सोडून द्यावा. त्यानंतर आपण Google Analytics वापरत नसाल, तर तो पर्याय देखील सोडून द्यावा.
४. Security Questions मध्ये Questions समोरुन कोणत्याही एका प्रश्नाची निवड करावी आणि खाली त्याचे उत्तर द्यावे. Agreement मध्ये Terms of use समोर I accept ची निवड करावी आणि शेवटी Submit Registration या बटनावर क्लिक करावे.
५. आता आपण दिलेल्या ईमेल पत्यावर एक मेल आला असेल. त्यामध्ये आपले रजिस्ट्रेशन निश्चित करण्यासाठी एका URL (Link) वर क्लिक करण्यास सांगितले असेल, त्यावर क्लिक केल्यानंतर आपले रजिस्ट्रेशन निश्चित होईल.

मूळ लिंक जाहिरात असलेल्या लिंकमध्ये कशी बदलावी?

लिंक शेअर करुन जास्त पैसे कमवणे

आपण आत्ता वर दिलेल्या साईटमध्ये असाल. जर नसाल तर आपले युजरनेम आणि पासवर्ड वापरुन साईटमध्ये प्रवेश करा. इथे मेनू मधून Create Links वर क्लिक करा. Build a Single Link मध्ये Link to convert समोर कोणतीही एक लिंक द्यावी. लिंक देत असताना लिंकच्या आधी http:// नमूद करणं आवश्यक आहे. उदा. http://2know.in. Page Content समोरुन Clean (All Ages) ची निवड करावी. Ad Type समोरुन Intermission ची निवड करावी. Alias URL समोरुन आपल्या आवडीचं कोणतंही URL निवडावे. शेवटी Generate Link वर क्लिक करा. त्यानंतर एक नवीन लिंक निर्माण होईल. या नवीन लिंकवर जो कोणी क्लिक करेल, त्याला आपली जाहिरात पहावी लागेल व मग तो मूळ लिंकवर जाऊ शकेल. जाहिरात पाहिली गेल्यानंतर लगेच त्याचे पैसे आपल्या खात्यात जमा होतील.

जाहिरातींचे प्रकार आणि पैसे

Side Banner, Top Banner हे जाहिरातीचे कमी त्रासदायक पण कमी पैसे देणारे प्रकार (Ad Type) आहेत. Intermission मध्ये पूर्ण पान जाहिरात पाहावी लागते. Short Link मधून केवळ लिंक रुपांतरीत होते, पण त्यातून आपल्याला काही पैसे मिळत नाहीत.

लॉकर लिंक (अधिक पैसे कमवण्याचा चांगला पर्याय)

Locker Link मध्ये मूळ पानावर जाण्याआधी त्या लिंकवर क्लिक करणार्‍या व्यक्तिला जाहिरातदार साईटचे रजिस्ट्रेशन पूर्ण करावे लागते. नाहीतर तोपर्यंत ते पान पूर्ण बंद राहते. ब्लॉगर लोक एखादे पुस्तक लिहून ते या लॉकर मध्ये बंद करु शकतात. ते पुस्तक वाचण्याआधी किंवा डाऊनलोड करण्याआधी लोकांना छोटिशी मोफत ऑफर पूर्ण करावी लागेल. त्यानंतर त्यांना ते पुस्तक असलेल्या पानावर जाता येईल. Locker Link चे बरेच चांगले पैसे मिळतात, तेंव्हा आपलाही अशाप्रकारे खूप चांगला फायदा होईल. लोकांना पुस्तक मोफत मिळेल आणि त्या पुस्तकाचे पैसे आपल्याला जाहिरातदाराकडून मिळतील.

ब्लॉगर्ससाठी: ब्लॉगवरील प्रत्येक लिंकमधून पैसे कमवणे

ब्लॉगर्सनी सरळ Full Page Script हा पर्याय निवडावा. इथे Link Group Name समोर आपल्या साईटचे/ब्लॉगचे किंवा कोणतेही नाव द्यावे. Page Content समोरुन Clean (All Ages) ची निवड करावी. Alias URL मधून आपल्या आवडीचे छोटे URL निवडावे. Generate Javascript वर क्लिक केल्यानंतर आपल्याला जो कोड मिळेल, तो आपल्या ब्लॉगच्या Html Gadget मध्ये टाकावा. त्यानंतर आपल्या ब्लॉगवरील कोणत्याही लिंकवर जेंव्हा वाचक क्लिक करेल, तेंव्हा त्याला त्या पानावर जाण्याआधी जाहिरात पाहावी लागेल व अशाप्रकारे आपल्याला ब्लॉगवरील प्रत्येक क्लिकनंतर पैसे मिळत राहतील.

लिंक शेअर करुन अधिक पैसे कमवण्यासाचे मार्ग

* अमेरीकेतून, युरोपमधून जर आपल्या लिंकवर कोणी क्लिक केले, किंवा ऑफर पूर्ण केली, तर भारताच्या तुलनेत आपल्याला ५ ते १० पट अधिक पैसे मिळतील.
* या साईटवर आपल्याला आपल्या खाली सभासद जोडता येतील. ते जितकं कमवतील त्याच्या २०% रक्कम आपल्याला मिळेल. आपल्या सभासदांच्या खाली जे सभासद असतील, ते जितकं कमवतील त्याच्या १०% रक्कम आपल्याला मिळेल. व आपल्या खाली तीसर्‍या साखळीत जे लोक असतील, ते जितकं कमवतील त्याच्या २% रक्कम आपल्याला मिळेल.

आपण कमावलेले पैसे आपल्यापर्यंत कसे पोहचतील? 

आपले पैसे आपल्यापर्यंत पेपालच्या माध्यमातून पोहचतील. पेपालचे खाते कसे काढायचे? आणि पेपाल संदर्भातील इतर सर्व माहिती मी मागील एका लेखात दिली आहे. पेपालवर खाते काढण्यासाठी त्या लेखाची मदत घ्यावी. ज्या ईमेल पत्याच्या माध्यमातून आपण पेपालवर खाते काढाल तो ईमेल पत्ता हाच आपला पेपालचा अकाऊंट नंबर असेल. वर दिलेल्या साईटच्या Manage Account या विभागात जाऊन Payment Account (Publishers) मध्ये Payment Type समोर Paypal ची निवड करावी आणि Payment Account समोर आपला पेपालचा ईमेल पत्ता टाकावा. त्यानंतर Update वर क्लिक करुन हे बदल जतन करावेत. या अपडेटची खात्री करुन घेण्यासाठी आपल्याला एक ईमेल येईल, त्या ईमेलमधील लिंकवर क्लिक केल्यानंतर आपले बदल जतन होतील. आपण कमीतकमी ५ डॉलर कमवल्यानंतर ते पैसे आपल्याला पेपालच्या खात्यावर मागवता येतील व तेथून ते आपल्याला आपल्या बँक खात्यात जमा करता येतील. हे पैसे जमा होत असताना आपोआप डॉलर मधून रुपयांमध्ये रुपांतरीत होतील.

लिंकवर क्लिक केल्यानंतर मूळ पानावर जाण्यासाठी आपल्याला ८ सेकंद पूर्ण पान जाहिरात पहावी लागते. त्यानंतर SKIP THIS AD वर क्लिक केल्यानंतर आपण मूळ पानावर जाऊ शकाल. अशाप्रकारे आपण पैसे कमवू शकाल.


Read more: लिंक शेअर करुन जास्त पैसे कमवणे | इंटरनेट, 2know.in http://www.2know.in/2012/08/blog-post.html#ixzz2OQymShae
Under Creative Commons License: Attribution Non-Commercial No Derivatives