आपल्याला व्यावहारिक जीवनात एखाद्या व्यक्तीला पत्र पाठवायचे असेल तर त्या पत्त्यावर आपला पत्ता व ज्याला पत्र पाठवायचे आहे त्या व्यक्तीचा पत्ता असणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे इंटरनेट (Internet) द्वारे जर एखाद्या व्यक्तीला ई-मेल (E-mail) (संदेश) पाठवायचा असेल तर त्यासाठी देखील आपला ई-मेल आयडी (E-mail ID) असणे आवश्यक असते.
· ई-मेल (E-mail) पाठवण्यासाठी ई-मेल आयडी (E-mail ID) नसेल तर तो आपल्याला इंटरनेट (Internet) वरून तयार करून घ्यावा लागतो.
· या ई-मेल आयडी (E-mail ID) तयार करण्याच्या पद्धतीस आपण ई-मेल अकाउंट आयडी (E-mail Account) उघडणे असे म्हणतो. उदा. बँकेमध्ये पैसे ठेवण्यासाठी अथवा इतर व्यवहार करण्यासाठी आधी अकाउंट (Account) उघडावे लागते.
· त्याचप्रमाणे ई-मेल आयडी (E-mail) करण्यासाठी आपल्याला एखाद्या वेब साईट (Web site) उदा. हॉटमेल, याहू, गुगलवर (Hotmail, Yahoo, Google) इ. ई-मेल अकाउंट (E-mail Account) उघडावे लागते.
No comments:
Post a Comment