प्रत्येकाचा ई-मेल हा निराळा असतो. म्हणजेच जगभरामध्ये तसा तो एकच ई-मेल असतो. म्हणूनच शक्यतो आपणास हवा असलेला ई-मेल पत्ता आपणास मिळत नाही. कारण आपणास ज्या नावाने ई-मेल हवा असतो तो आधिच कुणीतरी घेतलेला असतो. मग निरनिराळ्या नावाने शोधून शेवटी आपण उपलब्ध असलेला ई-मेल पत्ता स्विकारतो. मग तेव्हा आपणास मिळालेला ई-मेल पत्ता नंतर जगभरामध्ये इतर कुणालाही मिळत नाही, म्हणजेच त्या नावाने तो जगभरासाठी ई-मेल पत्ता बंद होतो.
एकदा का तुम्ही एखाद्या नावाने एखादा ई-मेल अकाऊंट बनविला तर तो तुमच्या नावाने लॉक होतो.
बर्याचवेळेस आपण निरनिराळ्या वेबसाईटवर (उदा. Yahoo, Gmail, Hotmail, Rediffmail) एकापेक्ष्या जास्त ई-मेल अकाऊंट उघडतो. सुरुवातीला हौसेखातर आपण निरनिराळ्या नावाने निरनिराळ्या ठिकाणी ई-मेल अकाऊंट उघडतो व नंतर कंटाळा येवून शेवटी आपण एखादाच ई-मेल अकाऊंट वापरतो. पण आपण न वापरणारे इतर ई-मेल अकाऊंट मात्र उगाचच तुमच्यनावाने लॉक झालेले असल्याने ते इतरांना देखिल मिळत नाहित.
शक्यतो जर आपण एखादा इतर ई-मेल अकाऊंट वापरत नसाल तर तो आपणहून बंद करावा. जेणे करुन इतर कुणास हवा असल्यात त्याला तो मिळेल.
आपण जर याहू, हॉटमेल, जीमेल अथवा रिडीफ या अथवा इतर कुठला ई-मेल बनविलेला असेल व जो आपण वापरत नसाल तर कृपया तो बंद करा. एखादा ई-मेल कसा करायचा ते गूगल मध्ये शोधल्यास आपणास त्याचे उत्तर सापडेल. उदा. जर आपणास आपला गूगलचा आपला एखादा ई-मेल बंद करायचा असेल तर गूगल.कॉमवर ' close gmail account ' असे शोधा बघा.
कुणालातरी त्याच्या आवडीप्रमाणे ई-मेल अकाउंट मिळण्यासाठी तुम्ही नक्कीच तुमचा वापरात नसलेला अथवा तुम्ही वापरत नसलेला ई-मेल बंद करा. कोणजाणे असाच कुणीतरी त्याला नको असलेला त्याचा ई-मेल बंद करेल आणि योगायोगाने तुम्हाला देखिल तेव्हाच त्याच ई-मेल नावाची गरज असेल. काय असू
No comments:
Post a Comment