Monday, 20 February 2012

यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये काही बदल करणे आवश्यक आहे.

यशस्वी होण्यासाठी आत्ता पर्यंत तुम्ही स्वतःमध्ये बरेच बदल केले असतील असे नक्कीच तुम्ही म्हणाल आणि त्याचा काही काहीच उपयोग झाला नाही असे देखिल तुमचे म्हणणे असेल. बरोबर ना ! पण खरी गोष्ट सांगू तुम्ही ते बदल नक्कीच केले नाहीत, खरंच. विश्वास ठेवा. कारण आपण बर्‍याच गोष्टी आपण करतो किंवा केल्या असे बोलतो पण प्रत्यक्ष्यात आपण काहीच केले नसते. असो. ते जावू दे. इथे पण असाच काहीसा प्रयत्न केला आहे पण थोड्या वेगळ्या प्रकाराने. खाली दिलेल्या सर्व गोष्टी नक्कीच सोप्या आहेत आणि त्या अंमलात आणणे पण शक्य आहे. आता बघूया यशस्वी होण्यासाठी तुम्ही स्वतःमध्ये हे सुचविलेले बदल करता का? 

'मी शहाणा आहे', 'मला कुणी मुर्ख बनवू शकत नाही', 'असे छप्पन पाहीलेत ', 'मी त्यातला नाही', 'असे जा रे', 'तु मला अजून ओळखले नाहिस', 'मला खोटं बोललेल चालत नाही', 'एकदा का मी बिघडलो तर माझ्यासारखा वाईट कुणी नाही'  ई. असे फालतू डायलॉग मारु नये. निट विचार केल्यास तुम्हाला आत्तापर्यंत कितीतरी लोकांनी मूर्ख बनविल्याचे तुम्हाला आठवेल.

कुठल्याही ज्योतिषाला तुमचा स्वभाव अथवा भविष्य विचारु नका. तो नेहमीच खालील गोष्टी सांगेल.
    * तुम्हाला इत्रांचे दुःख पाहवत नाही.
    * तुम्ही नेहमी दुसर्‍यांचा विचार करता.
    * तुम्ही इतरांसाठी खूप काही केलेत परंतू तुम्हाला गरज असताना कुणीच.....
    * तुम्हाला खोटे बोललेले आवडत नाही.
    * तुम्ही नेहमी इतरांना मदत करत असता.
    * आज पर्यंत तुमची कुणीच कदर केली नाही. ई. ई.
ज्योतिषांच्या मते जगातील सर्वच लोक 'वरील प्रमाणे' चांगले काम करत असतात. तर मग जरा विचार करा सर्वच जर 'तुमच्या सारखेच वरील प्रमाणे चांगले वागत असतील' तर जगात सर्वच चांगले का होत नाही ?
    कधी कुठल्या ज्योतिषाने असे सांगीतलेले एकले आहे का ?
    * तुम्हाला इतरांचे सुख पाहवत नाही.
    * तुम्ही नेहमी स्वतःचा विचार करता.
    * लोकांनी तुमच्यासाठी खुप केले पण तुम्ही त्यांना विसरलात.
    * स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही खोटे बोलता.
    * मी कशाला इतरांना मदत करु, असे तुम्हाला वाटते.
    * स्वतःच्या फायद्यासाठी तुम्ही इतरांची पर्वा करत नाही.

'एखादी गोष्ट माझ्या नशिबामध्ये नव्हती म्हणून मला मिळाली नाही' असा विचार करु नका.
    "आयुष्य तुम्हाला ज्या मार्गाने नेत असेल त्या मार्गाने जाऊ नका. तर तुम्हाला ज्या मार्गाने जायचे असेल त्या मार्गाने आयुष्याला न्या".

तुम्ही लाख म्हणा की तुम्ही प्रगती करत आहात. परंतू स्वतःची प्रगती पडताळून पहायासाठी खालील गोष्टी करा.
    *  दोन वर्षापूर्वी तुम्ही जे काम करत होता. तेच काम सध्या करता की त्यापेक्षा व्व्गळे चांगले अथवा मोठे काम सध्या तुम्ही करता का ते पहा.
    *  ( माफ करा पण ) स्वतःची लायकी पडताळायची असेल तर तुम्ही नोकरी सोडण्याचा विचार करत आहात असे आपल्या वरिष्ठ अधिकार्‍यास / साहेबांना सांगा. त्यांचे उत्तर जर 'ठिक आहे' असे त्यांनी दिले तर समजा कंपनीला तुम्ही असून-नसून काहिच फरक पडत नाही. तुम्ही जर खरंच कामाची व्यक्ती असाल तर त्याच महिन्यापासून तुम्हाला पगारामध्ये बढती मिळेल.

वेळ नाही असे कधी सांगू नका. वेळ काढायला शिका. सर्वाना वेळ द्यायला शिका.

तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करता ते चालूच ठेवा परंतू त्याबरोबर इतर क्षेत्रांचा पण अभ्यास भले तूमचा त्या क्षेत्राशी काही संबध नसेल पण नंतर भविष्यामध्ये तुमच्या या दोन्ही क्षेत्रांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केलात तर नक्किच तुमचा फायदा होईल.

एखादी व्यक्ती लहानपणापासूनच हुशार असते हा विचार बदला. कुणीही आणि वयाच्या कुठल्याही वर्षी हुशार होण्याचा मनापासून प्रयत्न केला तर ती नक्किच यशस्वी होते. उदा. माझेच ( सचिन पिळणकर. - ही वेबसाईट बनविणार ) उदाहरण घ्या. शाळेमध्ये अभ्यासात हुशार नव्हतो, कसाबसा पास व्हायचो. पाचवी ते नववी पर्यंत दरवर्षी मार्क वाढवून पास व्हायचो. दहावीला ४४ टक्के, बारावीला ३८ टक्के मार्क मिळवलेत. कुठल्याही कॉलेजमध्ये ऍडमिशन न मिळाल्याने मुंबई विद्यापिठातून शिकलो आणि भरपूर वेळा परिक्षा दिल्यानंतर कसाबसा पंधरावी ( B.Com. ) पास झालो. ( तुमचा विश्वासही बसणार नाही इतक्यावेळा मी B.Com.  ची परीक्षा दिली आहे. )  कॉम्प्युटरचा कुठलाही मोठा कोर्स केला नाही. पण असे असताना देखिल एकदा सहज विचार केला की वडील रिटायर्ड झाल्यावर आपले कसे होणार आणि शिकायला स्वतःच्या एकट्याने कॉम्प्युटरमधिल विविध सॉफ्टवेअर्स शिकायला सुरवात केली आणि अवकाशवेध.कॉम आणि सहजच.कॉम वेबसाईट ह्या माझ्या स्वतःच्या वेबसाईटबरोबर इतर ४० हून अधिक मोठ्या कंपन्यांच्या वेबसाईट बनविल्या आहेत. तसेच मोठ-मोठ्या कॉलेज, शाळा, तसेच कंपन्यामध्ये निरनिराळ्या विषयांवर लेक्चर्स घेतो. मी फक्त विचार केला आणि कमी वयामध्ये आणि वेळेमध्ये भरपूर शिकलो. आता मला माझ्याकडेच पाहून असे वाटते की एखादी व्यक्ती लहानपणापासूनच हूशार नसते तर तुम्ही वयाच्या कुठल्याही वर्षी विचार केल्यास तुम्ही हुशार होवू शकता.

1 comment: