मंडळी, हा लेख जरा काळजीपूर्वक वाचा. चटकन
नजर फिरवून निघालात तर हातात काही पडणार नाही. पण नीट वाचत शेवटपर्यंत
गेलात तर आयुष्यभरासाठी बरंच काही हातात आल्यासारखं वाटेल. रिअली, आय अॅम
सिरीयस.
असं बघा की जेवायचं ताटात,
आणि इंटरनेट पहायचं ब्राऊझरमध्ये. बरोबर? कोणी इंटरनेट एक्स्प्लोअरर मध्ये
पाहील, कोणी फायरफॉक्स पसंत करील, कोणी क्रोम चांगलं आहे म्हणेल. ताटं
वेगवेगळी पण इंटरनेट तेच. आता कल्पना करा की ताटाला संवेदना आहे. ताटाला चव
कळते आहे. अशा बऱ्याच गोष्टी त्याला कळताहेत. तर ताट त्याच्यात वाढलेल्या
पदार्थांबद्दल सर्वांत जास्त सांगू शकेल. आता अधिक जास्ती प्रस्तावना न
करता मी थेट विषयाकडे येतो.
http://www.20thingsilearned.com हे संकेतस्थळ कोणाचे आहे माहीत आहे का? ह्या संकेतस्थळाच्या नावाचं भाषांतर करून पहा, 'मी शिकलेल्या 20 गोष्टी' असं ते भाषांतर होतं. पाठोपाठ प्रश्न तयार होतात. कोण हा मी? कुठल्या त्या वीस गोष्टी? त्याचं संकेतस्थळ कशासाठी, त्यात काय आहे? बरं, प्रस्तावनेत ब्राऊझर आणि इंटरनेटचे संदर्भ आहेत. त्याचा ह्या संकेतस्थळाशी संबंध काय?
http://www.20thingsilearned.com हे संकेतस्थळ कोणाचे आहे माहीत आहे का? ह्या संकेतस्थळाच्या नावाचं भाषांतर करून पहा, 'मी शिकलेल्या 20 गोष्टी' असं ते भाषांतर होतं. पाठोपाठ प्रश्न तयार होतात. कोण हा मी? कुठल्या त्या वीस गोष्टी? त्याचं संकेतस्थळ कशासाठी, त्यात काय आहे? बरं, प्रस्तावनेत ब्राऊझर आणि इंटरनेटचे संदर्भ आहेत. त्याचा ह्या संकेतस्थळाशी संबंध काय?
तर,
मंडळी तुमचे हे तयार झालेले प्रश्न अगदी स्वाभाविक आहेत. सर्वांत
महत्त्वाचं उत्तर हे की हे संकेतस्थळ गुगल कंपनीचं आहे. आता पहा हे उत्तर
ऐकल्यानंतर तुमचा नूरच बदललेला मला दिसतो आहे. उत्तराचा पुढला भाग हा की
ह्या वीस गोष्टी इंटरनेट आणि ब्राऊझर यांच्या संबंधातल्या आहेत. मी
शिकलेल्या वीस गोष्टींमधला हा मी म्हणजे कोणी एक नाही. तर गुगल क्रोम
ब्राऊझरची सारी टीम म्हणजे मी असा अर्थ आपण घेतलेला बरा.
बरं कोणत्या वीस गोष्टी शिकल्या? तर त्या अशाः
1) इंटरनेट म्हणजे काय?
2)
क्लाऊड काँप्युटींग (तुमचा काँप्युटर वा लॅपटॉप ट्रकखाली आला तरी तुमचा
डेटा सुखरूप असतो, कारण खरं म्हणजे तो त्या चिरडलेल्या संगणकामध्ये नसतो,
तर चक्क ढगात असतो. हे ढग कोणते, नेमके कसे, डेटा तिथे नेमका कसा असतो
वगैरे माहिती ह्या प्रकरणात)
3) वेब अॅप्स (याला ह्या पुस्तिकेत अॅप्पीनेस असा गंमतीदार आणि सुखद शब्द वापरलाय)
4) एच.टी.एम.एल., जावास्क्रीप्ट, सी.एस.एस. आणि आणखी बरच.. (तांत्रिक पण महत्त्वाची माहिती)
5)
एच.टी.एम.एल. 5. (वर एक एच.टी.एम.एल. असताना हे आणखी एक एच.टी.एम.एल.
स्वतंत्र प्रकरणात? होय, कारण ते एकदम ताजं गरमागरम तंत्रज्ञान आहे. तुम्ही
त्या बद्दल वाचायलाच हवं.)
6)
ब्राऊझरमधलं थ्री डी. (थ्रीडी सिनेमा ऐकलाय, गेम ऐकलेत, आता थ्रीडी चक्क
ब्राऊझरमध्ये? होय, लक्षात घ्या गुगलच्या अधिकृत पुस्तकातली ही माहिती आहे.
कळला 'ता' म्हणता ताक-भात?)
7) जुने ब्राऊझर, नवे ब्राऊझर.
8) प्लग इन्स (वरण-भातावरचं झकास तूप लिंबूच म्हणा की)
9) ब्राऊझर एक्स्टेंशन्स (दो आंखेवाल्या ब्राऊझरला जेव्हा मिळतात बारा हात, आणि होतात शेकडो कामं सुलभपणे)
10)
सिंक्रोनायझिंग दि ब्राऊझर. (जमिनीवरचा ब्राऊझर, आणि त्याचं प्रतिबिंब
सेव्ह होतं ढगात. जमिनीवरच्या डेट्याला गंध लावलं की ढगातल्या प्रतिमेलाही
ते आपोआप लागतं त्या नात्याला म्हणायचं सिंक्रोनायझिंग)
11) ब्राऊझर कुकीज. (परवलीचा शब्द असतो ना, तसा हा परवलीचा कुरकुरीत पदार्थ.)
12) ब्राऊझर आणि प्रायव्हसी (शेवटी खाजगी म्हणून असतच बरच काही)
13) आणि 14) मालवेअर, फीशिंग, सुरक्षेचे प्रश्न (चोरी, दरोडा, तोडफोड, फसवणूकीपासून आपल्या ब्राऊझरचं घर वाचवायचं कसं हा मुद्दा)
15) संकेतस्थळाचा पत्ता, संकेताचा पत्ता.
16) आय.पी. अॅड्रेस आणि डीएनएस. (ऐकल्यासारखं वाटतय ना, मग शिकून घ्या थेट गुगलकडून)
17) ऑनलाईन असताना ओळख पटण्याचा मुद्दा.. (ओळखले का मला..)
18) वेगवान वेब, आणि त्यातील चित्रे, फोटो, चित्रफिती वगैरे.
19)
ओपन सोर्स ब्राऊझर्स (सार्वजनिक ब्राऊझर्स, सर्वांचे, सर्वांनी सर्वांसाठी
तयार केलेले. अर्थात त्यात तुमच्या आमच्या हिताचे संरक्षण असणारच)
20) एक दिवस काढू या इंटरनेटच्या ढगात..
हुश्श..
तुम्ही म्हणाल ही वीसची यादी वाचून झाली. आता पुढे ते पुस्तक वाचायचं. काय
चेष्टा आहे काय? तर मंडळी, हुश्श सोडा, आणि हो जाओ हुश्शार. अहो भरपूर
मनोरंजक चित्रांनी भरलेलं हे पुस्तक आहे. रटाळपणा नावालाही नाही. मोजक्या
आणि सोप्या शब्दात मोठा आशय संगणारं हे पुस्तक आहे. जास्तीत जास्त पानं
किती माहित आहे का, पन्नास. म्हणजे फार फार तर दोन वा अडीच पानाचं एक
प्रकरण. त्यातली अर्धी जागा रंगीत चित्रांनी खाल्लेली. म्हणजे एक दीड पानात
सगळा विषय संपवलेला. शिवाय पुस्तकाची पानं अॅनिमेट होत खरी खुरी पलटली
जाणारी. जणू काही आपल्या समोर आपणच पानं उलटतो आहोत. ते काही असो, पण
मित्रांनो, खूप शिकवून जाणारं हे पुस्तक आहे. खरं तर ते कुणीतरी मराठीत
भाषांतरीत करायला हवं. सगळी कामं सरकारनेच करावीत ह्या न्यायाने महाराष्ट्र
सरकारने त्याचं भाषांतर करावं ही सुचना कुणीतरी करीलच. असो.
ह्या
पुस्तकाची माहिती एवढी सविस्तर दिली याचं कारण संकेतस्थळाच्या नावावरून
तुम्हाला त्याची कल्पना येणार नाही. खूप मेहनत घेऊन गुगलच्या क्रोम ब्राऊझर
टीमने हे पुस्तक आपल्या हातात मोफत दिलं आहे. ह्या विषयावर लिहिण्याचा
अधिकार ज्यांचा आहे त्यांनी ते लिहीलं आहे, तज्ज्ञांसाठी नाही, तुमच्या
आमच्यासाठी.. http://www.20thingsilearned.com तुम्ही फक्त क्लीक करा.