Saturday, 17 March 2012

सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकर शंभरावे शतक करणारच होता. गेली 22 वर्षे ज्या सातत्याने, समर्पणवृत्तीने आणि मेहनतीने तो क्रिकेट खेळतोय ते पाहता असे अनेक विक्रम अजूनही त्याच्या नावावर जमा होतील. कोणा चाहत्यासाठी तो देव आहे, तर कोणासाठी सुपरमॅन. सचिनच्या धवल यशामागे त्याचे समर्पण, सातत्य आणि संघर्ष आहे आणि म्हणूनच सचिन हा सचिन आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांशी बोलून "सचिनपणा'चा घेतलेला हा वेध...
...सर्वश्रेष्ठ बनण्यासाठी सचिन जन्मजात योद्धा आहे.
गुणवत्ता, प्रामाणिकपणा व कठोर मेहनतीचा जबरदस्त संगम.
खेळावर (आणि कुटुंब व मित्रांवरही) प्रचंड निष्ठा.
सर्व प्रलोभनांपासून दूर.
मैदानावर पोचताच भान हरपून खेळतो. कारकिर्दीच्या सुरवातीच्या काळात खूप मोठे फटके मारत होता, त्यामुळे जास्त द्विशतके व त्रिशतक नाही.
प्रचंड जिद्द, इच्छाशक्ती व क्रिकेटवरील प्रेमामुळे केवळ खेळाचाच विचार.
पैसा, प्रसिद्धी व मानसन्मानाने तो हुरळून गेलेला नाही किंवा टीकेने खचलेलाही नाही.
तो मैदानात उतरतो तेव्हा जे काम दिले, ते तो करतो. तेव्हा तो "विक्रमवीर सचिन' नसतोच.
मी खेळापेक्षा मोठा नाही, ही भावना.
पाय कायमच जमिनीवर.

...कायम फिट राहण्यासाठी क्रिकेट या एकमेव गोष्टीचे वेड असल्याने खेळण्यासाठी लागेल ते करण्याची तयारी.
मला किती व्यायाम झेपतो व कुठे थांबले पाहिजे याचे अचूक ज्ञान.
व्यायामातील नवे तंत्र आत्मसात करण्याची व फायदे व तोटे जाणून घेण्याची योग्यता.
फिट राहण्यासाठी कोणत्याही प्रकारचा व कितीही वेळ व्यायाम करण्यासाठीचे समर्पण.
जिममध्ये फंक्‍शनल ट्रेनिंग घेऊन क्रिकेटमधील फटक्‍यांचा सराव.
दहा किलोची डम्बबेल किंवा प्लेट घेऊन स्विप व पॅडल स्विपसारख्या फटक्‍यांचा सराव.
धावा काढण्याचा सराव करीतच पळण्याचा व्यायाम. धावण्याची नैसर्गिक गुणवत्ता.
योग्य फिटनेस ठेवून क्रिकेटमधील करिअर लांबविण्याची क्षमता.
शरीरातील चरबीचे (फॅट) प्रमाण कमी ठेवण्यासाठी कायम प्रयत्न.
उंची कमी असल्याने गुरुत्वमध्य पायाकडे व त्यामुळे पायात ताकद. ती वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न. त्यामुळे अजूनही वेगाने धावू शकतो.
आणखी तीन ते चार वर्षे सहज खेळू शकेल.

...दुखापतीतून बाहेर पडण्यासाठी दुखापतींतून बाहेर पडण्यासाठीची जबरदस्त इच्छाशक्ती.
मैदानाबाहेर असतानाही कायमच हातात बॅट व पुन्हा मैदानात उतरण्यासाठी चोवीस तास धडपड.
फायटिंग स्पिरीट. दुखापतीतून बाहेर येण्यासाठी फिजिओने सांगितलेले व्यायाम दोन सेशनमध्ये प्रत्येकी पाच तास न कंटाळता करतो.
जगातील सर्वोत्कृष्ट तज्ज्ञांकडून उपचार घेऊन, दुखापतीची पूर्ण माहिती घेऊन प्रशिक्षक व फिजिओच्या मदतीने खेळात बदल करीत दुखापतींवर मात. पाठीच्या दुखण्यानंतर पुलचे फटके, टेनिस एल्बोच्या दुखापतीनंतर ऑफ साईडचे काही फटके व मिडविकेटवरच्या फटक्‍यांचे प्रमाण कमी करत शरीराचे अधिक नुकसान टाळले.
कोणतीही गोष्ट खूप लवकर शिकून घेण्याची वृत्ती. त्यामुळे व्यायामातील नवे तंत्र काही दिवसांत अवगत करून घेतो.
दुखापती होऊ नयेत यासाठी सातत्याने नियोजन. दौरा नसताना रोज न चुकता मैदानावर जाऊन सराव.
डिसिप्लीन, डिटरमिनेशन व डेडिकेशन या तत्त्वांचे पालन करीत दुखापतीवर मात.

समर्पण... कसोटी 188
वनडे 462
एकूण शतके 100
बळी 200
एकूण पन्नास 160
टी 20 - 1
एकूण धावा 33,854

सातत्य... वय 38 वर्षे 327 दिवस
धावांसाठी कापलेले अंतर 1168 किलोमीटर
मैदानात घालवलेले दिवस 3900
एकूण षटकार 260
एकूण झेल 254

संघर्ष... 1999 पाठ
2001 टाच
2002 मांडी
2002 हॅमस्ट्रिंग
2003 घोटा
2004 टेनिस एल्बो
2006 खांदा
2007 गुडघा

No comments:

Post a Comment