रील शीर्षकाची एक तासाची नवी कोरी डॉक्युमेंटरी फिल्म
'डिस्कव्हरी चॅनेल' तर्फे तातडीने तयार करण्यांत आली असून ती येत्या
रविवारी म्हणजे 16 ऑक्टोबर 2011 रोजी रात्री 8.00 वाजता पहायला मिळणार आहे.
16 ऑक्टोबर (रविवार) रात्री 8.00 ही वेळ अमेरिकन डिस्कव्हरी चॅनेलची असून
ती ह्या डॉक्युमेंटरी फिल्मच्या प्रिमियर शोची मूळ तारीख आणि वेळ आहे.
तेथील प्रक्षेपण संपल्यानंतर जगातील एकूण 210 देशांतील डिस्कव्हरी
चॅनेल्सवर देखील ती दाखविण्यांत येणार असल्याची माहिती 'डिस्कव्हरी चॅनेल'
ने दिली आहे.
अमेरिकेतील 16 ऑक्टोबरची रात्री 8.00 ते 9.00
ही एक तासांची वेळ म्हणजे भारतात 17 ऑक्टोबरच्या भल्या सकाळची 5.30 ते
6.30 ची वेळ. ह्या नंतर डिस्कव्हरी इंडियावर भारतीय वेळेनुसार
ती फिल्म नेमकी किती वाजता पहायला मिळेल याचा तपशील 'डिस्कव्हरी इंडिया' लवकरच जाहीर करील अशी अपेक्षा आहे.
ती फिल्म नेमकी किती वाजता पहायला मिळेल याचा तपशील 'डिस्कव्हरी इंडिया' लवकरच जाहीर करील अशी अपेक्षा आहे.
'डिस्कव्हरी'
वरील लोकप्रिय MythBusters ह्या सदरात ही डॉक्युमेंटरी दिसणार असून अडॅम
सॅवेज आणि जेमि हैनमन ही लोकप्रिय जोडी त्याचे निवेदन करणार आहे.
स्टीव्ह
जॉब्सचा सहवास लाभलेल्या अनेकांच्या मुलाखती त्यात असणार आहेत. स्टीव्ह
जॉब्स 19 वर्षांचा असताना, आत्मिक शांतीच्या शोधात त्याने डॅनियल कोटकी
ह्या आपल्या कॉलेजमधील मित्राला बरोबर घेऊन भारताला भेट दिली होती. कोटकी
हा नंतर अॅपलचा पहिला कर्मचारी म्हणून नेमलाही गेला होता. डिस्कव्हरीच्या
डॉक्युमेंटरी फिल्ममध्ये डॅनियल कोटकीची मुलाखतही घेण्यांत आली आहे, आणि
त्यात स्टीव्ह जॉब्सच्या भारतभेटीबद्दल महत्त्वाची माहिती मिळेल अशी
अपेक्षा आहे. भारताच्या दृष्टीने डॉक्युमेंटरीतील हा भाग हे प्रमुख आकर्षण
असणार आहे.
सदर डॉक्युमेंटरीची भारतातील वेळ निश्चित होताच आपल्या मित्रमंडळींना जरूर कळवा..
No comments:
Post a Comment