वेब कैमरा
आपण सिनेमात पाहील असले ही हीरो हिरोइन बरोबर चाटिंग करत आहे आणि ती हिरोइन त्याला चाटिंग करताना एक विंडो मध्ये मोनिटर च्या स्क्रीन वर हिरोइन लाइव चित्र रुपात दिसत आहे. ह्याला कारण की ती वेब कैमरा समोर बसली आहे . त्यामुळे वेब कैमरा समोर जे चित्र येइल ते दुसर्या व्यक्तीला दिसेल . वेब कैमरा हा एक विडियो शूटिंग कैमरा सारखा असतो . त्याने शूटिंग करून जे रिकॉर्डिंग केले आहे त्याचे आउट पुट आपणास मोनिटर च्या स्क्रीन वर बघायला मीळतो. वेब कैमरा त्याच्या मेगा पिक्सेल पाहून घेतला जातो जेवढे जास्त मेगा पिक्सेल तेवढा क्लेअर विडियो मीळतो. घरा मधील छोट्या मोठ्या कार्यक्रमाची शूटिंग आपण वेब कैमराने घेवू शकतो . वेब कैमरा USB पोअर्टला जोडला जातो .
पेन ड्राइव :-
CD मध्ये डाटा स्टोर करायला CD राईटर लागतो. ज्या ठिकाणी CD राईटर नाही त्या ठिकाणी डाटा कॉपी करण कठिण जात . फ्लोप्पी मध्ये खुप कमी डाटा स्टोर करता येतो म्हणुन फ्लो प्पी चा उपयोग जास्त मोठा डाटा कॉपी करण्यासाठी येत नाही . अशा वेळेस पेन ड्राइव हे अतिशय उपयुक्त साधन आहे .पेन ड्राइव मधे 256MB पासून ते सध्या 8GB पर्यंत साइज़ असणारे पेन ड्राइव उपलब्ध झाले आहेत . या मध्ये डाटा कॉपी करण ही अतिशय सोप आहे . ज्याप्रमाने आपण एखादी फाइल पीसी मध्ये कॉपी करून दुसरीकडे पेस्ट करतो त्याच प्रमाने पेन ड्राइव मध्ये आपण डाटा पेस्ट अथवा कॉपी करू शकतो .पेन ड्राइव USB पोर्ट ला जोडला जातो . पीसी ला जोडून आपणास पेन ड्राइव एक्सेस करायचा असल्यास माय कॉम्प्युटर आपण ओपन करून त्यात C: ड्राइव सारखा दुसर्या नावाचा पेन ड्राइवचा ड्राइव ओपन होतो . पेन ड्राइव मध्ये आता MP3 प्लेयर देखिल आले आहते ज्यामुळे आपण त्याचा २ प्रकारासाठी वापर करू शकतो . गाणी श्रवण करण्यासाठी आणि डाटा कॉपी करण्यासाठी .
No comments:
Post a Comment