Wednesday 28 March 2012

एंजॉय टक्सपेंटः मुलांसाठी धम्माल गेमःअशी क्रमाने वाचावी अशी विनंती आहे. हा दुसरा भाग आहे.पहिल्या आणि तिसऱ्या भागाच्या लिंक्स इथे आणि त्या त्या भागाच्या खाली दिल्या आहेत. त्यावर क्लीक करून पुढे जाता येईल. ) पहिल्या भागात आपण टक्स पेंट डाऊनलोड केला. आता तो आपल्या संगणकावर इन्स्टॉल करू. इन्स्टॉलेशन फार सोपं आणि बिन बोभाट होतं. प्रथम मूळ प्रोग्राम इन्स्टॉल करा. त्यासाठी tuxpaint-0.9.21c-win32-installer.exe ह्या तुम्ही डाऊनलोड केलेल्या फाईलवर क्लीक करा. तुमच्या संगणकावर फायरवॉल लावलेली असेल (बहुधा असणारच) तर ती वॉल टक्स पेंटला पुढे जाण्याची परवानगी द्यायची की नाही असा संदेश तुम्हाला देईल. ती परवानगी द्या आणि इन्स्टॉलेशन पूर्ण होऊ द्या. हे इन्स्टॉलेशन पूर्ण झाले की प्रोग्राम न उघडता (आणि उघडला असेल तर तो बंद करून) पुढला रबर स्टॅपचा अॅड ऑनही इन्स्टॉल करा. ही दोन्ही इन्स्टॉलेशन्स पूर्ण झाली की तुम्ही तुमच्या मुलांसाठी, नातवांसाठी, आणि एकूणच बच्चे कंपनीसाठी टक्स पेंट वापरायला मोकळे झालात. तुमच्या संगणकाच्या डेस्कटॉपवर टक्स पेंट चा शेजारी दाखवलेला आयकॉन आला आहे. त्यावर डबल क्लीक करून टक्स पेंट चालू करा. टक्स पेंट उघडताच प्रोग्रामचे चित्र तुमच्या समोर येईल. त्यावर एकदा क्लीक करा. खाली दाखवलेली विंडो तुमच्या समोर हाजिर होईल. आता ह्या विंडोत तुम्हाला हवं ते करण्याची मुभा आहे. बाकी सारं आपल्या नेहमीच्या पेंट ब्रश सारखंच आहे. फक्त आपल्याकडे असलेले वेगवेगळे रबर स्टॅप्स वापरून वेगवेगळी मजा आपल्याला आणि आपल्या बच्चे कंपनीला करता येते. वरील Paint टूल वर क्लीक करा आणि रेघोट्या मारा. किंवा, Stamp टूलवर क्लीक करून उजवीकडे कोणकोणती चित्रे उपलब्ध होतात ते पहा. आता त्यातून मुलांच्या डोक्यातून कशा वेगवेगळ्या कल्पना तयार झाल्या ते खालील चित्रांवरून तुमच्या लक्षात येईल. पूर्ण आकारात ही आणि आणखी शेकडो चित्रे पहायची असतील तर टक्स पेंटच्या साईटवरील गॅलरी पहायला हवी. त्यात वरील चित्र तुम्हाला पूर्ण आकारात पाहता येई


No comments:

Post a Comment