Wednesday, 11 April 2012

दोन अथवा अनेक कॉम्प्युटर्सना एकमेकांना कसे जोडाल?

दोन किंवा जास्त कॉम्प्युटर्सना एकमेकांना जोडून त्यांचामध्ये Networking केले जाते. एकेकाळी अनेक कॉम्प्युटर्समध्ये Networking करणे फार कठीण काम होते. परंतू सध्या वापरल्या जाणार्‍या विंडोज XP आणि VISTA मध्ये कितीही कॉम्प्युटर्सना Networking द्वारे एकत्रित जोडणे अगदी सोपे बनले आहे. या कामाला जास्तीत जास्त मिनिटे लागतात आणि यासाठी कॉम्प्युटर हार्डवेअरच्या क्षेत्रातील इतर कुठल्याही अतिरिक्त माहितीची गरज नाही.
नेटवर्किंगचे फायदे खाली दिले आहेत.
. नेटवर्किंगमधिल कॉम्प्युटर्समध्ये फाईलींची देवाणघेवाण सोपे होते. उदा. सीडी, पेन ड्राईव्ह अथवा फ्लॉपीची गरज नाही.
. नेटवर्किंगद्वारे जोडलेल्या सर्व कॉम्प्युटर्सवर इंटरनेट वापरता येते.
. नेटवर्किंगमधिल कुठल्याही कॉम्प्युटरवरुन कुठल्याही कॉम्प्युटरला जोडलेल्या प्रिंटरद्वारे प्रिंट काढता येते.
. वेळ वाचतो.

No comments:

Post a Comment