Saturday 28 April 2012

इंटरव्ह्यू देताना (भाग - 2

कधी कधी एखाद्या जॉबवर आपलं भरपूर प्रेम बसतं. आपण तशाप्रकारच्या जॉबसाठी मुलाखत द्यायला जातो. खूप इच्छा असूनही आपल्या हाती काहीच लागत नाही. त्यावेळी जी निराशा निर्माण होते, त्यातून मार्ग काढण्यासाठी काय करावं ?

सोनाली मांजरेकर :
तुम्ही इंटरव्ह्यूचा शेवट कसा करता त्यावर त्या गोष्टी अवलंबून असतात. खूपदा काय होतं,कधी कधी एखाद्या जॉबवर आपलं भरपूर प्रेम बसतं. आपण तशाप्रकारच्या जॉबसाठी मुलाखत द्यायला जातो. खूप इच्छा असूनही आपल्या हाती काहीच लागत नाही. त्यावेळी जी निराशा निर्माण होते, त्यातून मार्ग काढण्यासाठी काय करावं ?

सोनाली मांजरेकर :
तुम्ही इंटरव्ह्यूचा शेवट कसा करता त्यावर त्या गोष्टी अवलंबून असतात. खूपदा काय होतं, आपण तयारी करून जातो. खूपदा इंटरव्ह्यूही चांगला जातो. पण त्याच्यानंतर समोरून कॉलच येत नाही ना आपण फॉलोअप करत. याकरता तुम्ही त्या इंटरव्ह्यूचा शेवट कसा करता यावर हा मुद्दा अवलंबून असतो. अशावेळी मुलाखत घेणा-याला एखादा मेल किंवा एसएमएस करण्यापेक्षा तुम्हाला काय विचारायचं आहे का, असं जेव्हा एखादा मुलाखत घेणारा विचारतो तेव्हा जरूर विचारायचा. माझं इथलं कामाचं स्वरूप काय असेल हा प्रश्न तर जरूर विचारायचा. त्यामुळे तुमची त्या कामाबद्दलची उत्सुकता समोरच्याचा लक्षात येते. आणि तेवढ्या एखाद्या मुद्यावर तुम्हाला नोकरी मिळू शकते.

एखाद्याकडे कोणतीही फॉर्मल डिग्री नासते. पण स्किल सेट उत्तम असतो. अशावेळी बायोडाटा बनवताना काय काळजी घेतली पाहिजे. कारण जेव्हा कंपनी डॉक्युमेन्टस मागतात तेव्हा ती देणं कठीण जातं. तेव्हा बायोडाटा, रेझ्युमी रायटिंगबद्दल काय काळजी घ्यायची ?

सोनाली मांजरेकर : तर अशावेळी तुम्ही कोणत्या प्रकारचं काम कोण कोणत्या व्यक्तींबरोबर केलंय ते वर्षांसकट तपशीलवार लिहावं. तसा अनुभवही तुम्हाला तो जॉब देऊही शकतो.

डॉमनिक कोस्टाबिर : या सिच्युएशनमध्ये कधीही खोटं बोलायचं नाही. सगळ्या प्रश्नांची प्रामाणिकपणे खरीखरी उत्तरं दिली गेली पाहिजेत.

शेवटी इंटरव्ह्यूमध्ये विचारला जाणारा प्रश्न म्हणजे व्हाय यू ओन्ली डिझर्व्ह फॉर धिस जॉब, तर अशावेळी काय उत्तर दिलं पाहिजे ?

डॉमनिक कोस्टाबिर :
असा प्रश्न विचारल्यावर नोकरीची भीक मागायची नाही. तर तुमची निवड केल्यानं कंपनीला कसा फायदा होऊ शकतो हे तुमच्यातल्या गुणांसहीत सांगावं.

नोकरी शोधताना लवकर स्थैर्य मिळेलच असं नाही. तर अशावेळी काय करावं ?

डॉमनिक कोस्टाबिर :
हा तर आजकालच्या सगळ्या तरुणाईचा प्रश्न आहे. तुम्हाला 40 व्या वर्षीही तुमचा जॉब बदलता येतो. पण अशावेळी तुमचा कामाचा अनुभव तुम्हाला फायदाचा ठरतो.

सोनाली मांजरेकर : जॉबमध्ये स्थैर्य नसणं याचा एकतर अर्थ तुम्ही तुमचं करिअर नीट प्लॅन केलेलं नसणं हा आहे. किंवा तुम्हाला फक्त कामाचा अनुभव घेऊन पुढे काहीतरी करायचं असेल.

आम्ही तुला रिजेक्ट का करावं, असं वाटतं, अशावेळी काय उत्तर द्यावं ?

डॉमनिक कोस्टाबिर : माझ्याकडे या प्रश्नाचं उत्तरचं नाहीये. कारण मला तुम्ही रिजेक्ट करावं याचं कारण मी देऊ शकत नाही.

सोनाली मांजरेकर : माझ्याकडे हेहे गुण आहेत ज्याच्यामुळे तुम्ही माझी निवड टाळूच शकत नाही, असं स्मार्टली उत्तर द्यावं.

अशी कोणती गोष्ट आहे की जी तुमच्या सीव्हीत नाही, अशावेळी काय उत्तर द्यावं ?

सोनाली मांजरेकर : अशावेळी तुमचा छंद सांगावा. पण त्या छंदातली लेटेस्ट गोष्ट सांगता आली पाहिजे. सांगता नाही आलं तर तुमची चोरी पकडली जाते.
आपण तयारी करून जातो. खूपदा इंटरव्ह्यूही चांगला जातो. पण त्याच्यानंतर समोरून कॉलच येत नाही ना आपण फॉलोअप करत. याकरता तुम्ही त्या इंटरव्ह्यूचा शेवट कसा करता यावर हा मुद्दा अवलंबून असतो. अशावेळी मुलाखत घेणा-याला एखादा मेल किंवा एसएमएस करण्यापेक्षा तुम्हाला काय विचारायचं आहे का, असं जेव्हा एखादा मुलाखत घेणारा विचारतो तेव्हा जरूर विचारायचा. माझं इथलं कामाचं स्वरूप काय असेल हा प्रश्न तर जरूर विचारायचा. त्यामुळे तुमची त्या कामाबद्दलची उत्सुकता समोरच्याचा लक्षात येते. आणि तेवढ्या एखाद्या मुद्यावर तुम्हाला नोकरी मिळू शकते.

एखाद्याकडे कोणतीही फॉर्मल डिग्री नासते. पण स्किल सेट उत्तम असतो. अशावेळी बायोडाटा बनवताना काय काळजी घेतली पाहिजे. कारण जेव्हा कंपनी डॉक्युमेन्टस मागतात तेव्हा ती देणं कठीण जातं. तेव्हा बायोडाटा, रेझ्युमी रायटिंगबद्दल काय काळजी घ्यायची ?

सोनाली मांजरेकर : तर अशावेळी तुम्ही कोणत्या प्रकारचं काम कोण कोणत्या व्यक्तींबरोबर केलंय ते वर्षांसकट तपशीलवार लिहावं. तसा अनुभवही तुम्हाला तो जॉब देऊही शकतो.

डॉमनिक कोस्टाबिर : या सिच्युएशनमध्ये कधीही खोटं बोलायचं नाही. सगळ्या प्रश्नांची प्रामाणिकपणे खरीखरी उत्तरं दिली गेली पाहिजेत.

शेवटी इंटरव्ह्यूमध्ये विचारला जाणारा प्रश्न म्हणजे व्हाय यू ओन्ली डिझर्व्ह फॉर धिस जॉब, तर अशावेळी काय उत्तर दिलं पाहिजे ?

डॉमनिक कोस्टाबिर :
असा प्रश्न विचारल्यावर नोकरीची भीक मागायची नाही. तर तुमची निवड केल्यानं कंपनीला कसा फायदा होऊ शकतो हे तुमच्यातल्या गुणांसहीत सांगावं.

नोकरी शोधताना लवकर स्थैर्य मिळेलच असं नाही. तर अशावेळी काय करावं ?

डॉमनिक कोस्टाबिर :
हा तर आजकालच्या सगळ्या तरुणाईचा प्रश्न आहे. तुम्हाला 40 व्या वर्षीही तुमचा जॉब बदलता येतो. पण अशावेळी तुमचा कामाचा अनुभव तुम्हाला फायदाचा ठरतो.

सोनाली मांजरेकर : जॉबमध्ये स्थैर्य नसणं याचा एकतर अर्थ तुम्ही तुमचं करिअर नीट प्लॅन केलेलं नसणं हा आहे. किंवा तुम्हाला फक्त कामाचा अनुभव घेऊन पुढे काहीतरी करायचं असेल.

आम्ही तुला रिजेक्ट का करावं, असं वाटतं, अशावेळी काय उत्तर द्यावं ?

डॉमनिक कोस्टाबिर : माझ्याकडे या प्रश्नाचं उत्तरचं नाहीये. कारण मला तुम्ही रिजेक्ट करावं याचं कारण मी देऊ शकत नाही.

सोनाली मांजरेकर : माझ्याकडे हेहे गुण आहेत ज्याच्यामुळे तुम्ही माझी निवड टाळूच शकत नाही, असं स्मार्टली उत्तर द्यावं.

अशी कोणती गोष्ट आहे की जी तुमच्या सीव्हीत नाही, अशावेळी काय उत्तर द्यावं ?

सोनाली मांजरेकर : अशावेळी तुमचा छंद सांगावा. पण त्या छंदातली लेटेस्ट गोष्ट सांगता आली पाहिजे. सांगता नाही आलं तर तुमची चोरी पकडली जाते.

No comments:

Post a Comment