Wednesday 25 April 2012

एव्हरेस्टजवळ छत्रपतींची प्रतिष्ठापना

माऊंट एव्हरेस्टच्या मोहिमेवर निघालेल्या पुण्याच्या गिरीप्रेमीच्या गिर्यारोहकांनी केवळ महाराष्ट्रालाच नाही, तर साऱ्या भारतदेशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी बजावलीय.

या गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट पायथ्याशी असलेल्या गोरक्षेप गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना केली आहे. मराठी मनाला अभिमानास्पद असा हा सोहळा रविवारी दुपारी संपन्न झाला.
...
पुण्यातील प्रसिद्ध मूर्तीकार दिनकर थोपटे आणि दिपक थोपटे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांचा हा पुतळा तयार केला आहे. हिमालयातल्या वातावरणात दीर्घकाळ टिकेल अशा धातूत हा पुतळा घडवण्यात आलाय.

एव्हरेस्टच्या पायथ्याला गोरक्षेप गावात चार फूट उंचीच्या दगडी चौथऱ्यावर शिवछत्रपतींच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आलीय. त्यानिमित्तानं गिरीप्रेमीच्या वतीनं स्थानिक शेर्पांच्या मदतीसाठी छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक प्रकल्पही सुरू करण्यात आला.

No comments:

Post a Comment