Saturday 28 April 2012

ती ती आणि ती

काय बोलू. कालचा दिवस एकदम ‘सही’. अजूनही शरीरभर रोमांच उठत आहेत. बस काय बोलू कालच्या दिवसात काय घडल ते. फक्त ती ती आणि ती. दिवसभर कम्युनिकेटरवर गप्पा मारल्या. आणि ती माझ्या डेस्कवर सुद्धा आलेली. यार, काल रात्रभर नीट झोप लागली नाही. शेवटी पहाटे साडेतीन चारला टीव्ही सुरु केला. पण तिथेही जाम बोर झाल. मुळात आज घरात जाम बोर झालेलं. तिच्या आठवणीने व्याकूळ करून टाकलेलं. खरच, तिच्याशिवाय नाही सुचत काही. ती इतकी छान, गोड का आहे? आणि स्वभावाने इतकी प्रेमळ आणि सरळ. तिची खूपच आठवण येत आहे. मला नव्हते घरात करमत. म्हणून आज, मी ऑफिसला आलेलो आहे.
तशी सुट्टी आहे. पण अजूनही ती असल्याचा भास होतो आहे. हे सगळ ते दोन आठवड्यापूर्वी तिच्या एका ‘फोन’ची कमाल आहे. देव खरच खूप चांगला आहे. मी म्हटलेलं ना. एकदा मी आणि माझा मित्र दुपारच्या वेळी ब्रेक आउट रूममध्ये बसलेलो. त्यावेळी ती फोनवर बोलत तिथे आलेली. खर तर तिच्याच बद्दल मी माझ्या मित्राशी बोलत होतो. तिच्या बोलण्यावरून तिचा संगणक बिघडल्याचे समजले. फोन झाल्यावर तिला मी तिच्या संगणकाबद्दल विचारलेल. मग जवळपास दहा पंधरा मिनिटे गप्पा मारलेल्या. माझे मित्र खूप चांगले आहेत. म्हणजे ती माझ्याशी बोलत असतांना, कधीच नाक खुपसत नाहीत.
दुसर्या दिवशी बोलता बोलता तिला एका अँटी व्हायरस बद्दल सांगितले. तर तिने त्याचा मला सेटअप मागितलेला. त्याच्या पुढच्या दिवशी मी तिला पेन ड्राईव्हमध्ये तो आणून दिला. तिने तो मागील आठवड्यात सोमवारी आणून दिला. तिला विकएंड बद्दल विचारलेल त्यावेळी म्हणाली, संगणक आता रिपेअर झाला आहे. आणि अजून काय केलस विचारल्यावर म्हणाली, मी एक चित्रपटांची डीव्हीडी विकत आणली. तिला म्हटलं, हा पेन ड्राईव्ह पुन्हा घेऊन जा आणि मला ती डीव्हीडी यात कॉपी करून दे. तर म्हणाली मी पुढच्या आठवड्यात घेऊन जाईल. ‘का’ विचारल्यावर बोलली, मी बाहेर फिरायला जाणार आहे.
तिने डेस्कवर गेल्यावर पिंग करून ‘मी पुढच्या आठवड्यात नक्की तुझा पेन ड्राईव्ह घेऊन जाईल’. अस म्हणाली. तिला म्हणालो ‘माझ्याकडे सुद्धा काही चित्रपट आहेत’. तर तिने कोणते विचारल्यावर आपले दोन चार चित्रपटांची नावे सांगितली. ती म्हणाली, इंग्लिश नको. हिंदी भाषांतरित आहेत काय? तिला ‘हो’ म्हटल्यावर ‘क़्वलिटी कशी आहे?’ अस तिने विचारलं. तिला म्हणालो ‘खूप चांगली नाही पण, चांगली आहे’. तर ठीक आहे बोललेली. असो, तो आठवडा खूपच जालीम होता. संपतच नव्हता. सारखी तिची आठवण यायची. न झोप यायची. आणि आली तरी स्वप्नात तीच असायची. खरच खूप बेजार झालेलं. सोमवार कधी येतो अस झालेलं. पण तो मागील आठवड्यातील सोमवार, यार ‘बुट्टी’ झाली.
मंगळवारी आलो तर तिचा पहिला प्रश्न तोच ‘काल कुठे होतास?’. बर मी टाईप करतो तोच तिचे त्या कम्युनिकेटरवर अजून दोन चार प्रश्न. मग जो शेवटचा प्रश्न त्याचे उत्तर दिले. पण खूप छान वाटलेलं. म्हणजे तिच्या ‘मी नव्हतो’ ही गोष्ट लक्षात आलेली. मी त्या दिवशी म्हणजे मागील मंगळवारी हार्ड डिस्क ऑफिसमध्ये घेऊन आलेलो. पण ती उद्या नेते बोलली. ती हार्ड डिस्कवारी सलग तीन दिवस करावी लागली. परवा ती माझी हार्ड डिस्क घेऊन गेली. अबे, मी तेच तेच उगाळतो आहे. असो, किती छान आहे ती! काल मी सकाळी कॅन्टीनमधून फ्लोरवर आल्यावर डेस्ककडे जातांना नजरानजर झालेली. माझ्याकडे पाहून हसली. यार, तिला हसतांना पहिले की, कलिजा खलास होतो. नंतर मी डेस्कवर बसल्यावर मला पिंग केले. आणि तिने पहिलाच बॉम्ब टाकला.
मला म्हणाली ‘चांगला दिसतो आहेस’. खरंच ते पाहून हार्ट अटॅक येतो की काय अस झालेलं. तिला स्माईली टाकून ‘धन्यवाद’ म्हणालो. आणि तिला ‘आणि तू सुद्धा’ म्हणालो. ती ‘मी म्हटले म्हणून म्हणालास, हो ना??’ अस बोलली. मी काय बोलू? ती इतकी सुंदर आहे, ती इतकी गोड स्वभावाची आहे. तिची नजर म्हणजे!!! ती!!! तिला म्हणालो ‘नाही नाही, असो’. तिनेही स्माईली टाकून ‘असो’ म्हणाली. मी स्माईली टाकल्यावर, तिनेही स्माईली. मला म्हणाली ‘वाद नको, मी हे मान्य करते की, मी सुंदर आहे’. नंतर थोड्या हार्ड डिस्क मधील चित्रपटांच्या गप्पा झाल्या. नंतर ती सांगत होती. दिलेली सीडी.. अरे सीडी बद्दल सांगितलंच नाही ना मी! तिला एक्स सिक्स मोबाईलचे मोडॅम ड्रायव्हर हवे होते, तिच्या मोबाईलचे. यार तिने दोन दिवसांपूर्वी पुन्हा तो ‘एक्स सिक्स घेतलास का?’ अस विचारलेलं. काय यार, तिसऱ्यांदा झाल अस. इतकी छोटी मी गोष्ट अजून करू नाही शकलो.
मग परवा सकाळी तिला मी पिंग करून सांगितलं की, माझ्याकडे दोन बातम्या आहेत. एक चांगली आणि दुसरी वाईट. तिने विचारल्यावर, तिला म्हणालो, मला ती एक्स सिक्स मोडॅम ड्रायव्हरची सीडी मिळाली. आणि तिने वाईट बातमी विचारल्यावर, तिला म्हणालो ज्याने मला ही सीडी दिली ना, तो म्हणाला की ह्या सीडीत प्रॉब्लेम आहे. पण तिला म्हणालो, एकदा प्रयत्न करायला काय हरकत आहे. नंतर त्या दिवशी ती माझ्या डेस्कवर सुद्धा आलेली. किती छान! पण पुन्हा ‘तुम्ही’. सोडा ते! ती सीडी घेऊन गेली. परवा संध्याकाळी हार्ड डिस्क घेऊन गेली. काल बोलत होती. तेव्हा म्हणाली ‘तुझा मित्र बोलला ते खर आहे. त्या सीडीमध्ये काही प्रॉब्लेम आहे. नेट कनेक्ट होत नाही’. मी तिला दुसर्या मित्रांकडे आहे का ते पाहतो अस म्हणालो. तर ‘नको’ म्हणाली. पुढे बोलली, मी अजून एकदा प्रयत्न करून पाहते. आणि सोमवारी तुला सीडी देते म्हणाली. मला सांगत होती की तिने माझ्या ‘हार्ड डिस्क मधील तुझ्या बहिणाबाईचे फोटो पहिले, ‘सॉरी’ म्हणत होती. यार, किती गोड आहे ती! अप्सरा खरंच खूप छान आहे. दिसायला सुद्धा आणि मनाने सुद्धा. तिला म्हणालो हरकत नाही.
मला म्हणाली ‘तुझी बहिण अगदी तुझ्यासारखी दिसते’. आता बहिण माझी म्हटल्यावर अस असणारच ना! ती जरी चुलत बहिण असली तरी. माझ्या बहिणाबाईचे ‘हे’, म्हणजे माझे ‘दाजी’ हिंदीत काय बोलतात ‘जीजू’ हॅंडसम दिसतात अस बोलली. खर तर खूप हॅंडसम आहेत. तिला ‘हो’ म्हणायच्या ऐवजी मी चुकून ‘हम्म’ म्हणालो. काय माहित काय अर्थ काढला. मला म्हणाली ‘काय?’. मी तिला ‘हॅंडसम आहेत, स्माईल’ टाकली. ती ‘हो’ म्हणून ‘त्या दोघांचे लव्ह की अरेंज मेरेज झाले?’ अस विचारले. ती पुन्हा मी काही म्हणायच्या आत ‘माझ्या मते, अरेंज’. मी तिला ‘लव्ह कम अरेंज’. माझ्या बहिणाबाईची, मैत्रिणीचा तो भाऊ होता. अस सांगितल्यावर, ती ‘वॉव’. मला म्हणाली ‘तू देखील आता बहिणीची मैत्रीण शोध आणि लग्न करून टाक’. मला म्हणाली ‘तुला राग येणार नसेल तर एक विचारू का? तुझ किती वय आहे?’ मी आपला ‘२५’. आता १९८५ जन्मवर्ष म्हणजे पंचवीस पूर्ण ना. थोड्या फार हार्ड डिस्कबद्दल गप्पा झाल्या. नंतर ती म्हणाली ‘नवीन शर्ट का?’ मी ‘नाही, जुनाच आहे’. मला म्हणाली ‘मला पर्पल कलर आवडतो, तुला कोणता रंग आवडतो?’. मी ‘मला सर्व रंग आवडतात. सर्व रंग समभाव’.
तिला म्हणालो ‘तुला खाण्यातील कुठला पदार्थ आवडतो?’. तर म्हणाली ‘फिश करी आणि भात’. तिला ‘गुड’ म्हणालो. ती ‘तू, पिठलं भाकरी आणि काय?’ खर बोलायचे झाले तर ‘हो’ म्हणणार होतो. पण टाळल. तिला ‘मेथी’ म्हणालो. मला म्हणाली ‘मला भाकरी नाही बनवता येत’. तिला मी ‘मला तर काहीच बनवता येत नाही’. काय बोलणार ती? ‘शेम’ करीत बसली. तिला म्हटलं ‘पण मोठे काम येते ना’. ती ‘तुला लाज वाटायला पाहिजे. मॅगी आणि चहा तरी? ‘. तिला म्हटलं ‘मला काही हरकत नाही, काहीही खायला’. मला म्हणाली ‘हे बर आहे. तू तुझ्या बायकोला सुखी ठेवशील’. तिला स्माईली टाकून ‘तुला काय बनवायला आवडते?’. तर म्हणाली ‘मला स्वयंपाक येतो. पण मला त्याचा कंटाळा आहे. कधी कधी मूड असेल तर करते छान!’ तिला विचारलं, खर तर मला माहिती आहे. पण तरी सुद्धा ‘तू डबा आणतेस?’. तर ती ‘हो, पण रोज रोज करायला आवडत नाही’. तिला म्हटलं ‘आता?’ तर म्हणाली ‘मागील तीन महिन्यांपासून स्वयंपाकाला एक बाई ठेवली आहे’. तिला म्हटलं ‘तुला माहिती आहे का, की बाहेरच्या जेवणाने ताकद येत नाही’. ती ‘माहित आहे. मला बाहेरचे जेवण रोज रोज खायला नाही आवडत’.
मी ‘तू गॅस आणला आहेस का? म्हणजे तू स्वयंपाक कसा करतेस?’. तर बोलली ‘निश्चितच. काय तू पण? चुलीवर करणार का?’. मी ‘नाही, म्हणजे रूमवर अलाउ नसत ना. म्हणून विचारलं’. ती ‘कोण म्हटलं अलाउ नसत. आमचा फ्लॅट आहे.. पीजी नाही’. मग मी जरा त्या माझा आउटलुकचा झालेला प्रॉब्लेम विचारला तर म्हणाली, मला हे असले विषय आवडत नाही. पुन्हा आपले तिचे सुरु, ‘मला माहिती आहे तुला टेक्निकल गोष्टींचा फॅन आहे’. मग मी काय बोलणार? तिला म्हणालो ‘विषय बदल’. मग स्माईली टाकून बोलली ‘तुझा वाढदिवस कधी असतो?’ मी ‘२५ मे’. ती ‘ओह, पॉइण्ट नोटेड’. तिला म्हटलं ‘तू वाढदिवस कसा साजरा केलास? शॉपिंग?’. ती ‘नाही. आज मी जो टी-शर्ट घातलेला आहे न, तो वाढदिवसाला घेतलेला. कसा आहे?’. काय बोलू यार तिला? ती प्रत्येक ड्रेसमध्ये खूप खूप छान दिसते. तिला म्हटलं ‘छान. म्हणजे खूप चांगला आहे. पण पट्या पट्याचा का घेतलास?’. ती ‘मला पट्टे आवडतात. म्हणून’. मी ‘अच्छा’.
मी म्हटलं ‘तुझा वाढदिवस १५ला असतो ना. मी १६ला बाईक बुक केली’. मला वाटल ती विचारेल कोणती केली ते. पण ती उलट ‘अजून काय बाकी’. मी ‘खर तर, १५ ला गेलेलो. पण जायला उशीर झाला. शोरूम लवकर बंद झालेलं. असो’. यार त्या ‘असो’ ने घोळ केला. ते ‘असो’ पाहून म्हणाली ‘अबे, तू नाथ माधव आहेस का? की शशी भागवत?’ मी ‘का? काय झाल?’ ती ‘कारण तू सारख सारख असो असो वापरतो आहेस. ही ही! तुला माहिती आहेत का हे लेखक?’.  मी ‘नाही. मी वाचत नाही. मला आवडत नाही. खूपच बोरिंग..’. काय माहित भडकलीच, मला म्हणाली ‘तू बोरिंग, स्माईली. मला पुस्तके आवडतात. लाईक क्रेझी’. मी ‘अच्छा म्हणजे तुला आवडतात. तुला ते ई-पुस्तक (द ओल्ड म्यान एंड हीज गॉड – सुधा मूर्ती) हवे होते ना’. ती ‘?, मी ते घेईल. कदाचित आज’. तिला म्हटलं ‘ते पुस्तक मला मिळाले. तू नको घेऊ. पण माझ्याकडे आता नाही आहे. मी तुला ते सोमवारी देईल’. तर बोलली ‘ऐक, मी एका वाचनालयाची सदस्य आहे. मी ते तिथून सहजासहजी घेऊ शकते. मला त्या दिवशी हव होते. कारण फक्त त्यावेळी माझ्याकडे काही काम नव्हते’. मी काय बोलणार? ओके म्हणालो. काल मी उपास केलेला. इति श्री बहिणाबाई आज्ञा! दुपारी मित्रांना भेटायला कॅन्टीनमध्ये जाण्यासाठी जिन्यातून निघालो. तर ती तिच्या मित्रांसोबत फ्लोरवर येत होती.
किती छान! यार तिचे हसणे. ती हसत हसत माझ्याकडे पाहून नुसता हात दाखवला. थोडक्यात, माझी स्टाईल मारलेली. नंतर तिची केटी सुरु झालेली. त्या एक काकू बाई तिला आणि त्या नारळाला केटी देत बसलेल्या. पण तो नारळ, एकदा श्रीमुखात किंवा श्री’कमरेत’ माझा हस्त किंवा पदस्पर्श घडून आणावा अस वाटत. कार्टून तिच्याकडे पाहतो. काय करू, अस कोणी तिच्याकडे अस पहिले की माझ पित्त खवळते. पण काय करणार.. बसतो आपला शांत. नंतर ती तिच्या मित्रांकडे जरा वेळ. जरा वेळ नाही जरा जास्तच वेळ गप्पा मारीत होती. कदाचित कामातून वेळ मिळाला की, अस करायची. मला खरच खूप बेकार वाटायला लागलेलं. यार, तिचे मित्र. काय माणस आहेत? ती इतकी छान स्वतःहून त्यांच्या डेस्कवर जावून ती गप्पा मारते. एकतर ह्यांना कोण काळ कुत्र भाव देत नाही. आणि ती इतकी सुंदर मुलगी, ते पण स्वतःहून जावून बोलते. तर जणू काय फार काम पडल आहे. कंपनीचे सगळे काम जणू ह्यांच्याच अंगावर पडले आहे असा आविर्भाव. ती खरच खूप चांगली आहे. संबंध कसे टिकवायचे, हे त्या तिच्या मित्रांनी तिच्याकडून शिकायला हवं. सोडा. मला त्यावेळी खूपच बेकार वाटायला लागलेलं. वाटल, ती फक्त एक साधा मित्र समजते मला. यार, ह्या डोळ्यांचे काही तरी करायला हवं. मी डेस्कवरून उठून वॉशरूममध्ये गेलो. थोडा फ्रेश झाल्यावर बाहेर येण्यास तो दरवाजा उघडणार. तेवढ्यात एक कार्टून. ते महा-कार्टून आहे. खूप जोरात दरवाजा विरुद्ध बाजूने ढकलला. थोडक्यात बचावलो. नाहीतर डोक फोडलच असते त्याने.
एकतर आधी नारळ, नंतर तिचे मित्र पाहून आधीच मस्तक बिघडलेलं. त्यात ह्या महा-कार्टूनचे ‘जलवे’. यार त्याला काही पद्धतच नाही. चूक घडो अथवा न घडो, सॉरी म्हणायची एक पद्धत असते. हे बिनबुडाचे पात्र तसंच गेल. बर मी त्याच्याकडे पहिले तर हे कार्टून माझ्याकडे रागात पाहत गेल. तसं त्याच हे नेहमीचेच आहे. आधीही दोनदा, मी माझ्या खुर्चीचा हात असतो ना. त्याचा नट निघालेला. तो लावत होतो. तर हे कार्टून धक्का मारून गेल. ह्यावेळी टाळक सरकलेल होत. मी मुठ आवळलेली. पण नंतर स्वतःवर ताबा ठेवला. यार, मी आतापर्यंत कधी कोणाशी भांडाभांडी नाही केली म्हणजे करूच शकत नाही अस नाही. डेस्कवर येऊन शांत बसलो. पण राग काही केल्या जातच नव्हता. पण नंतर तिने पाचच्या दरम्यान मला पुन्हा पिंग केल त्यावेळी खूप छान वाटलेलं. मला विचारात होती कधी निघणार वगैरे.. थोड्या तिच्या प्रोजेक्ट बद्दल गप्पा झाल्या. तिच्या कामाला वेळ लागणार होता. तिला घरी जायची घाई झालेली. नंतर तिने ते काम डीप्लोय करायला सुरवात केली. नंतर मी तिला म्हणलेलं ‘तुला एक गोष्ट सांगू?’ तर तीच ‘हो’. एकतर त्या कार्टूनचा राग काही केल्या जात नव्हता. म्हटलं ते कार्टून तिच्या प्रोजेक्टमधील आहे. उगाच तिला सांगितल्यावर तिला वाईट वाटायचे. तिला म्हटलं ‘प्लीज, रागावू नको. हे फक्त मी अनुभवलं आणि पाहिलेलं आहे’. ती ‘ओके. मी का रागावेल?. माझा तेव्हा मूड जातो, ज्यावेळी तू तुझ्या पद्धतीने माझी मदत मागतोस. जी की काही रिक्वयर नसते’. मी ते पहिले आणि तिला त्या कार्टूनबद्दल टाकणार तेवढ्यात माझा एक मित्र आला. मी त्याच्याशी थोडा वेळ बोलल्यावर तिला ‘तू नाहीस पण, तुझ्या प्रोजेक्ट मधील अनेक लोक स्वभावाने चांगले नाही’. अस टाकून वरती पाहतो ते ती माझ्या डेस्कवर. मग तिच्या कम्युनिकेटरचे स्टेटस पहिले तर अवे.
ती माझ्या डेस्कवर बसलेली. असो, आता जे बोललो ना तेच तिला सांगितलेलं. किती छान! मग राग गेला. ती मला मी या कंपनीत कधी परमनंट होणार ते विचारात होती. मी जॉब सोडला. आणि मला दुसरी कंपनी मिळाली अस बोलाव वाटलेलं. अगदी तोंडापर्यंत आलेलं. पण नाही बोललो. थोड्या वेळाने ती तिच्या कामासाठी गेलेली. नंतर पिंग करून सुद्धा बराच वेळ गप्पा चालू होत्या. जातांना मला तिने माझी ती हार्ड डिस्क दिली. यार, घरी निघतांना खूपच बेकार वाटलेलं. काय माहित तिला माझी आठवण आली असेल की नसेल. तसा निघतांना ती लिफ्ट मध्ये माझ्या शेजारी उभी होती. खूपच धडधड वाढलेली. आणि मस्त देखील वाटत होते. यार, आयुष्यात असा दिवस येईल अस कधीच वाटले नव्हते.
हुश्श! पण एकूणच खूपच छान! अरे!!! हे काय, किती बडबडलो?? दोन हजार शब्द.. बबब!! बस. फारच जास्त पकवले ना! पुन्हा इतके नाही करणार. पण मन आता शांत झाल आहे. आणि खूपच बर वाटत आहे.

No comments:

Post a Comment