Saturday 28 April 2012

क्षमा असावी.. महाराज

राजे आम्हाला क्षमा करा! खरच आमच चुकल. महाराज तुमचा २०२० मध्ये इतिहास कसा असेल? कसा बदलला जाईल. यावर हा बापडा बोलला. राजे आता काय बोलायचं? वर्तमान काय वर्णावा. आपले मावळे, आपल्याच मावळ्यांची उणीदुणी काढत बसले आहे. कुणा मावळ्याला वाटत माझीच जात ‘लय भारी’. आणि दुसऱ्याची जात ‘राक्षसाची’. बर राजे तुम्हीच सांगा.
तुमच्या इतिहासाने कोणत्या मराठ्याच्या अंगातल रक्त सळसळणार नाही? छाती पहाडी आणि मनगटात हत्तीच बळ येणार नाही? महाराज वर्तमान असा आहे की, तुमच्या इतिहासात जातीची भिंग लावून लई मोठ्ठी शोधमोहीम चालू झालीय. मग काय, हा अमक्या जातीचा. काढा ह्याला बाहेर. इतिहासातून त्याची पाळमूळ तोडा. आधी सरकार करायचं. महाराज आमचा वर्तमान अंधारात चाललाय. रस्त्याचे प्रश्न सोडा पण दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडते आहे. आमचे हुशार अर्थतज्ञ प्रधानमंत्र्यांनी आपल्या देशाची अवस्था एखाद्या रुग्णालयात अंथरुणाला खिळलेल्या सत्तरी गाठलेल्या म्हाताऱ्याची केलीय. बर, इतकी महागाई केलीय की. आमचं चिडणं देखील बंद होवून गेलंय. भाववाढ म्हणजे सरकारच खेळण झाल् आहे. कधी हे सरकार जातंय अस करून सोडलं याने.
पण इकड मात्र, आपले मावळे मंडळी. एकमेकांच्या जातीचा उद्धार करण्यातच मश्गुल. महाराज, यात भविष्य आहे का? तुम्ही स्वराज्य निर्माण केल. त्याच सर्वस्वी श्रेय फक्त तुम्हाला आहे. मग मी महाराजांच्या जातीचा. म्हंजी महाराज फकस्त माजे. अस बोलण्याला काय अर्थ आहे? आणि इतिहासात फकस्त माझ्याच जातीचे लोकांनी महाराजांना साथ दिली. उरलेली सगळी मंडळी जन्माला आलेलीच नव्हती. नंतर इतिहासात टाकली.
महाराज, खरंच यावर बोलायला देखील लाज वाटते. तिकडे शेतकरी शेतमालासाठी आंदोलन करत आहेत. अनेकांनी जगण्याला कंटाळून आत्महत्या केली. आता हे सुद्धा जातीच्या चष्म्यातून पहायचं म्हटलं तर अनेक सावज सापडतील. पण आपले मावळे काय जातीचा चष्मा सोडायला तयार नाहीत. बर राजे, सगळे असेच. हा त्याच्या जातीला आणि तो ह्याच्या जातीला नाव ठेवणार. ह्याच्या पलीकडे काहीच नाही. देशात काय चाललंय. प्रत्येक प्रश्न किती गंभीर होत चाललंय. पण ते गेल् चुलीत. माजी जात आन फकस्त माझेच महाराज. महाराज, नाव तुमचे घेणार. आणि रात्री दारूत बुडणार. सकाळ झाली की, कालच्याच विषयावर. माझी जात म्हणजे लय भारी. आणि महाराज काय झाल् की, माफी मागयालाच हवी. बर ह्यांच्यात काय अस पहावं, तर फक्त ‘जात’. महाराज ह्यांच्या जातीच भूत डोक्यातून काढा. तसदी बद्दल क्षमा मागतो. जय भवानी| जय शिवाजी||

No comments:

Post a Comment