Saturday 28 April 2012

काय करायचं या परप्रांतीयाचं?

दुधात भेसळ करणाऱ्या दोन आंध्र प्रदेशातील दोन तरुणांना काल पिंपरीत पोलिसांनी अटक केली. एक आहे बक्तुल रामचंद्र गिरी आणि दुसरा उमेश कृष्णा दांडे नामपल्ली. दोघेही खराळवाडी मधील साईकुंज इमारतीच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टीत राहणारे. रोज सकाळी साडेचार वाजता एका डेअरी मधून दीडशे लिटर दुध खरेदी करून अजमेर मधील एका ग्राहकाला काही पिशव्या त्याच किमतीत विकत असत. काही पिशव्या एका बाजूने फोडून त्यामधून दुध काढून, तेवढेच पाणी पिशव्यात भरून त्या सील करत असत. पन्नास लिटर दुध मागे दहा लिटर अतिरिक्त दुध हे निर्माण करत असत. चिखली आणि मोरेवस्ती येथील हॉटेल, चहाच्या टपऱ्या या ठिकाणी ते विकत असत. रोजचे निदान ३००-५०० रुपये सुटत असत.
पुण्यात आजकाल जिथे बघा तिथ हीच मंडळी आहे. कुठून येतात आणि कधी येतात ते देखील कळत नाही. पहिल्या पावसानंतर कुत्राच्या छत्र्या उगवतात ना तशा इथ रोज नव नवीन झोपडपट्ट्या निर्माण होतात. मग फुटपाथ काय आणि मोकळ्या सरकारी जागा काय सगळी ह्यांच्याच बापजाद्याची मालमत्ता. कोणी विचारात नाही. आणि कोणी हाकलत नाही. कोणी काही करायचं ठरवलं तर लगेच मानव अधिकारवाले आहेतच की. बर शाळा यांच्या बापानी पण नाही पाहिलेली. मग टाक सिड्याची आणि गुटका, पान सुपारीची हातगाडी. कुठेही सुरु करा. कोण हटकणार नाही. कुठेही आणि कसेही राहणार. पण सरकार त्यांची काळजी घेणार. हे चोऱ्या करणार आणि पोलीस यांना पकडणारच नाहीत. आपल्या करांच्या पैश्यातून रस्ते, फुटपाथ बांधणार. आणि मग हे परप्रांतीय झोपड्या बांधणार. मग एवढ्यावर याचं भागणार नाही. मग भेसळी करणार. सगळीकडे हेच. विषात पण भेसळ करतील. पण यांना कोणी काही बोलणार नाही. काही वर्षांपूर्वी सिंहगडला एक रेव्ह पार्टी प्रकरण फारच गाजलं होत. त्यात पण हे परप्रांतीयच. एका पोलिसाला मध्यंतरी पुण्यात गाडीने चिरडण्याचा प्रयत्न करणारा म्हातारा पण परप्रांतीयच. मध्यंतरी पुण्यात काही हत्या झाल्या त्या देखील करणारे परप्रांतीयच. काय करायचं आता या पराप्रांतीयाचं?

No comments:

Post a Comment